अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत ३६८ मिमी पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola weather update

अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत ३६८ मिमी पाऊस

अकोला - जिल्ह्यात जूनपासून ते आतापर्यंत सरासरी ३६७.९ मिमी पाऊस पडला असून, गेल्यावर्षी सुद्धा २४ जुलैपर्यंत ३७२ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती. गेल्यावर्षी जिल्ह्यात उशिरा मॉन्सूनच्या पावसाचा जोर दिसून आला होता. यावर्षी मात्र, जूनच्या दुसऱ्या आठवड्यतच मॉन्सूनची हजेरी लागली. परंतु, पावसाचा अपेक्षीत जोर सुरुवातीला दिसून आला नाही व तीन ते चार दिवसांचा खंड देत पावसाने हजेरी लावली. मात्र, जुलैमध्ये दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि अवघ्या आठवडाभरातच पावसाने सरासरी गाठली.

आतापर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात सरासरी ३६७.९ मिमी पाऊस पडला असून, जून ते सप्टेंबरच्या सरासरीच्या तुलनेत तो ५३ टक्के झाला आहे. पुढील आठवडाभर सुद्धा पावसाचा जोर कायम राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले असल्याने यावर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान १०० टक्के सरासरी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Akola Weather Update Monsoon 368 Mm Rainfall

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..