कौतुकास्पद ! वृद्धांक्षमातील वृद्धांना मदत देऊन केला साध्या पद्धतीने विवाह

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

सामाजिक बांधिलकी राखत स्वतःच्या विवाह प्रसंगी एक वेगळा विचार समाजासमोर मांडला हल्ली आपण लग्न प्रसंगी नातेवाईकांना अहेर करून नाते संबंध जोपासत असतो पण ज्या वृद्ध बांधवाना स्वतःचा नातेवाईकांनी दूर सारले व त्यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

तेल्हारा (जि. अकोला) : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अनुसरून सामाजिक कार्याचा वसा घेत कोरोना संकट समयी कुठलाही लग्नाचा इतरत्र खर्च न करता गाडेगाव येथील एका युवकाचा स्वतःचा लग्न सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने दहिगाव मधील श्रीनाथ वृद्धाश्रम येथील वृद्धांना मदत करून पार पडला.

क्लिक करा- धक्कादायक : कोरोनामुक्त झालेल्या या जिल्ह्यात आता उद्रेक सुरू; तब्बल ऐवढे रुग्ण पॉझिटिव्ह

कपड्यांचा दिला आहेर
गाडेगाव येथील मोहनकार कुटुंबातील रतन पांडुरंग मोहनकार या युवकाने शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासत सामाजिक बांधिलकी राखत स्वतःच्या विवाह प्रसंगी एक वेगळा विचार समाजासमोर मांडला हल्ली आपण लग्न प्रसंगी नातेवाईकांना अहेर करून नाते संबंध जोपासत असतो पण ज्या वृद्ध बांधवाना स्वतःचा नातेवाईकांनी दूर सारले व त्यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अशा गरजूंना कपड्यांचा अहेर देऊन व वृद्धांचे आशीर्वाद घेऊन वैवाहिक जीवनाला सुरुवात करणारे रतन व मुक्ताई यांच्या आगळा वेगळ्या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

हेही वाचा- महाबीजचे बियाणे भरले कमी अन् खड्यांनी गमावली हमी; 30 किलोच्या बॅगीत इतके ग्रॅम खडेच

यांच्या उपस्थितीत पार पडला विवाह
तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड, जि.प. सदस्य संजय अढाऊ, माजी शहर प्रमुख पप्पू सोनटक्के, रामा फाटकर, सचिन थाटे, अतुल घंगाळ, किशोर डांबरे, अक्षय गावंडे, श्याम बोर्डे, गजानन अमृतकार, सागर भोगे, अंकुश आठवले, शैलेश ढाळे, सुजय मझोळकार, चेतन गावंडे, दीपक पळसकार, वैभव गावंडे, अंकुश बुरघाटे, अभय गाडेकर, नितीन आखरे, प्रदीप महल्ले, धंनजय गावंडे, श्रीकांत मोहनकार, अक्षय मोहनकार, आदित्य काकड, प्रसाद वाकोडे, अभिषेक मोहनकार, प्रणव कड यांच्यासह मोहनकार कुटुंब उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola The wedding ceremony passed in a simple manner