अकाेला : शेतीच्या वादातून महिलेस मारहाण

विविध कलमांतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल
Akola Woman beaten agricultural dispute
Akola Woman beaten agricultural disputesakal

शिरपूर : शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या वांघी खुर्द येथील सोनूबाई खरात या महिलेस जमिनीच्या वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिवाजी हिरामण खरात यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिनांक १९ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजताचे सुमारास वाघी खुर्द शेतशिवारातील शेतामध्ये फिर्यादीची आई, बहिण व मित्र वाघी खुर्द शेतशिवारातील शेतामध्ये काडीकचरा वेचण्यासाठी गेले असता, आरोपी काशीराम श्रीराम खरात, हिरामण श्रीराम खरात, श्रीराम राघोजी खरात, संतोष कुंडलिक खरात, इंदुबाई किसन तागड, देवकाबाई संतोष तागड, लक्ष्मीबाई श्रीराम खरात, राहणार वाघी खुर्द, रवी भरत सावंत राहणार जांभूळ तालुका लोणार यांनी घराच्या व शेतीच्या वादातून फिर्यादीची आई सोनूबाई खरात यांना ऊस तोडणीच्या कोयत्याने, स्पिंकलरच्या लोखंडी पाइपने, लाकडी काठी, दगड व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

त्यामुळे फिर्यादीची आई गंभीर जखमी झाली व फिर्यादीच्या बहिणीस जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे पो. नि. सुनील वानखडे ,पीएसआय शरद साठे, सपोनि महादेव भारसाकळे, पोहे का संतोष पाईकराव, सतीश चव्हाण, श्रीकृष्ण नागरे, ज्ञानबा खिल्लारे आदीनी घटनास्थळ गाठले व जखमी महिलेस रुग्णालयात दाखल करून पुढील कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपी श्रीराम राघोजी खरात व लक्ष्मीबाई श्रीराम खरात या दोन आरोपींना अटक केली आहे.

वर्दीतील माणुसकी

सदर घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मारहाण झालेली महिला गंभीर जखमी बेशुद्धावस्थेत वाघी खुर्द शेतशिवारातील शेतामध्ये पडली होती. रुग्णवाहिकेची वाट न बघता शिरपूर पोलिस स्टेशनचे पोहे का संतोष पाईकराव यांनी जखमी महिलेस तब्बल एक किलोमीटर खांद्यावर उचलून पोलिसांच्या गाडीपर्यंत आणले, रुग्णालयात दाखल केले व माणुकीचा परिचय दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com