अकोला : अत्याचारी नराधमास जन्मठेप

महिला घरात एकटी असताना केला होता अत्याचार
Akola women atrocity accused Life imprisonment punishment
Akola women atrocity accused Life imprisonment punishmentsakal

अकोला : घरात एकट्या असलेल्या महिलेवर चाकूच्या धाकावर अत्याचार करणारा नराधम अन्सार शहा सत्तार शहा (२८, रा. मजलापूर) याला विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.गोगरकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरवित मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

घटनेची हकीकत अशी की, ता. २८ जुलै २०१६ रोजी पीडिता ही घरी एकटी असताना तिच्या घराचा दरवाजा नराधम अन्सारने ठोकला. पीडितेने कोण आहे हे पाहण्याकरिता दरवाजा उघडला असता तो दार ढकलून घरात घुसला. पीडितेला पकडून तिचे तोंडावर हात ठेवून शरीर सुखाची मागणी केली. तिच्या पोटाला चाकू लावून धाक दाखवत जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला.

ही घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी ही घरात एकटीच असल्याने तिने पती कामावरून घरी परत आल्यावर त्यांना सदरहू घटना सांगितली. त्यानंतर पीडितेने बोरगांव मंजू पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३७६(i), ४५०, ४५२, ३५४(ए) (iii), ५०६ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास करून तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात आरोपी विरुध्द दोषारोप पत्र सादर करण्यात आले.

या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरिता एकूण सहा साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य माणून वि. न्यायालयाने अन्सार शहा सत्तार शहा याला भा.द.वि. ३७६(i), ३५४(A) (iii) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व तीन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय कलम ४५०, ४५२ भा.दं.वि. अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व सात हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली.

कलम ५०६ भा.दं.वि. अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजाराचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची साधी कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील श्याम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी हे.कॉ. कंडारकर व एलपीसी. सोनू आडे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com