अकोला : शिक्षण पदाेन्नतीतील त्रुटी दूर

पुढील आठवड्यात सभा; जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर लक्ष
Akola Zilla Parishad education department promotion process
Akola Zilla Parishad education department promotion processsakal

अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या पदाेन्नती प्रक्रियेतील त्रृटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी व प्रशासनातील वादामुळे ब्रेक लागल्यानंतर आता ही प्रक्रिया तुर्तास तरी पुढे सरकली आहे. या त्रृटी निकाली काढण्यात आल्या तरी यावर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले की नाही, हे पुढील आठवड्यात हाेणाऱ्या पदाेन्नती समितीच्या सभेत दिसून येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत (प्राथमिक) विविध संवर्गाच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबिवण्यात येत आहे. पदोन्नतीची प्रक्रिया प्राथमिक शिक्षकांच्या बदलीपूर्वी करणे गरजेचे असल्याने पदोन्नती समितीची सभा ३० मे रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती सावित्रीबाई राठोड यांनी पदोन्नती प्रक्रियेच्या प्रस्तावाची फाईल स्वतःकडे ठेवली असल्याने ३० मे रोजी या बाबतची सभा झाली नाही. परिणामी सीईओंनी उपाध्यक्षांना पत्र देत पदाेन्नतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास त्याची जबाबदारी आपली राहिल, असे नमूद केले हाेते. त्यानंतर हे प्रकरण अध्यक्षांपर्यंत पाेहाेचले हाेते.

चाैकशीचा ऊहापोह बैठकीत पदाेन्नतीबाबत उपाध्यक्षा व जि.प. प्रशासनामध्ये पत्रांची देवाण-घेवाण झाली हाेती. नंतर अध्यक्षा प्रतिभा भाेजने यांनी शिक्षण विभागाच्या फाइलमध्ये काही बाबींचा उहापाेह केला हाेता. त्यांनी उपाध्यक्ष-शिक्षण सभापतींच्या अभिप्रायाचा संदर्भ दिला. पदाेन्नती प्रक्रियेत कथित गैरव्यवहार करणे, अपात्र व्यक्तिंना पदाेन्नती देण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे ही प्रक्रिया संशयास्पद असल्याचेही नमूद केले हाेते. त्यामुळे शिक्षण सभापतीच्या मागणीनुसार या प्रक्रियेची चाैकशी करण्यात यावी असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले हाेते. आता नेमकी चाैकशी झाली काय, ही बाब पदाेन्नती समितीच्या बैठकित स्पष्ट हाेणार आहे.

रिक्त पदांची संख्या वाढणार

शिक्षण विभागातील ४ संवर्गातील पदे पदाेन्नतीद्वारे भरणे आवश्यक आहेत. मुख्याध्यापक (उर्दू) २९, मुख्याध्यापक (मराठी) ६७, विस्तार अधिकारी (श्रेणी २)- ४, विस्तार अधिकारी १२ पदे रिक्त आहेत. त्रृटी काढण्यात अल्यानंतर काही विस्तार अधिकाऱ्यांची पदे वाढली आहेत. त्रृटी दूर करण्याचे काम शिक्षण विभागाकडून पूर्ण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com