जिल्हा परिषदेचे नवे सीईओ सौरभ कटियार रूजू

सुगत खाडे  
Thursday, 23 July 2020

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) सौरभ कटियार हे बुधवारी, ता.22 जुलै रोजी रूजू झाले. पालघर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात ते कार्यरत होते.

अकोला  ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) सौरभ कटियार हे बुधवारी, ता.22 जुलै रोजी रूजू झाले. पालघर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात ते कार्यरत होते.

अकोला जि.प.चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांची पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओ पदी बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी शासने पुण्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी यू.ए. जाधव यांची बदली केली होती.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

ते रुजू न झाल्याने फेब्रुवारीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. सुभाष पवार रूजू झाले. डॉ. पवार यांच्याकडे सीईओ पदाचा प्रभार सुद्धा सोपवण्यात आली होता. बुधवारी सकाळी नवे सीईओ म्हणून सौरभ कटियार यांनी पदभार स्वीकारला. त्यांचे सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, नेत्यांनी स्वागत केले.

यावेळी अध्यक्षा प्रतिभा भोजने, शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, देखरेख करण्यासाठीच्या समितीचे सदस्य दिनकर खंडारे, सभापती मनिषा बोर्डे आदी उपस्थित होत्या.

(संपादन-विवेक मेतकर)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Zilla Parishad's new CEO Saurabh Katiyar joined