Akot : अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-उपसभापती निवड अविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akot Agricultural Produce Market Committee  Prashant Pachde Chairman and Atul Khotre Vice Chairman

Akot : अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती-उपसभापती निवड अविरोध

अकोट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रशांत पाचडे यांची, तर उपसभापतीपदी अतुल खोटरे यांची अविरोध निवड झाली. या निवडीचे सर्वस्तरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृहात नवनिर्वाचित संचालकांची पहिली सभा आज शनिवारी (ता.२०) पार पडली.

सहाय्यक निबंधक सह.संस्था तथा निवडणूक अधिकारी म्हणून आर. एम. जोशी यांनी कामकाज केले. सहकार अधिकारी समीर साखरे व सचिव सुधाकर दाळू यांनी सहाय्य केले. यावेळी नवनिर्वाचित संचालक विजय राहाणे, गजानन डाफे, रमेश वानखडे, प्रशांत पाचडे, कुलदीप वसू, गोपाल सपकाळ, बाबा जायले, श्याम तरोळे, बाबाराव इंगळे, शंकरराव लोखंडे, प्रमोद खंडारे, वृषाली सोनोने, अरुणा आतकड, रितेश अग्रवाल, सुनील गावंडे, अफजल खान आसीफ खान उपस्थित होते.

तत्पूर्वी सहकार ज्येष्ठ नेत्यांचे बैठकीत पहिल्या अडीच वर्षासाठी सभापतीपदासाठी प्रशांत पाचडे व उपसभापतीपदासाठी अतुल खोटरे तर दुसऱ्या अडीच वर्षासाठी सभापती धीरज हिंगणकर व उपसभापती पदासाठी रमेश वानखडे यांचे नावावर सहकार परिवाराचे अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर यांनी शिक्कामोर्तब केले.

गत ता.२८ एप्रिल रोजी पार पडलेल्या व गाजलेल्या निवडणुकीत सहकार पॕनलने सर्व जागा जिंकून दणदणीत विजय प्राप्त केला होता. दरम्यान सहकार परिवाराचे वतीने नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा ज्येष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगणकर व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, जि.प.चे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सहकारी जिनिंगचे अध्यक्ष सुभाष वानखडे, उपाध्यक्ष रामदास थारकर, खविसचे संचालक सुभाष मगर, भाजप नेते डाॕ. राजेश नागमते, राकाँचे तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनोख राहाणे, जि.प.सदस्य प्रकाश आतकड, दयाराम धुमाळे, शांताराम मानकर, पूर्णाजी पाटील, अरुण जवंजाळ, रामदास ताडे, गजानन गावंडे, दयाराम धुमाळे, जिनिंगचे संचालक राजेश पुंडकर,

पुरुषोत्तम मुरकुटे, अजाबराव मोकळकर, कैलास कवटकार, रहेमततुला खाँ पटेल, सुभाष लटकुटे, देविदास बुले, बाळासाहेब फोकमारे, भास्करराव काळंके, कैलास कवटकार, डाॕ.म्हैसणे, दादाराव देशमुख, मनोज बोंद्रे, आनंद पाचबोले, दीपक पाटील, प्रा.प्रदीप ओळंबे, नंदकिशोर भांबुरकर, दत्तात्रय ओळंबे, सारंगधर वालसिंगे, बाळू मंगळे आदींसह सहकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी हिताला सर्वोच्य प्राधान्य द्या; नानासाहेब हिंगणकर

कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत शेतकरी मतदारांनी आपणावर मोठा विश्वास ठेवून निवडून दिले. त्या विश्वासाला कदापिही तडा जाणार नाही. याची दक्षता घेत बाजार समितीच्या कारभारात शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे.

स्वच्छ व कुशल कारभार करावा असा हितोपदेश नानासाहेब हिंगणकर यांनी देऊन अभिनंदन केले. सभापती प्रशांत पाचडे व उपसभापती यांनी सहकार नेते, कार्यकर्ते व संचालकांचे आभार मानले. व्यापारी अडते मतदार संघातून निवडून आलेले अपक्ष संचालक रितेश अग्रवाल व सुनील गावंडे यांनीही सहकार पॕनलला पाठिंबा दिला.