
आकोट ते अकोला मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. अनेक ठिकाणी सिमेंटीकरण काही अंतरापर्यंत झाले आहे. त्यातही एका साईट सिमेंटीकरणाची असुन काही ठिकाणी दोन्ही साईट सिमेंट कॉंक्रिटीकरण आहेत.
अकोट (जि.अकोला) : आकोट ते अकोला मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून रखडलेले आहे. अनेक ठिकाणी सिमेंटीकरण काही अंतरापर्यंत झाले आहे. त्यातही एका साईट सिमेंटीकरणाची असुन काही ठिकाणी दोन्ही साईट सिमेंट कॉंक्रिटीकरण आहेत.
मात्र अकोट ते बळेगाव व वणी वारुळा पर्यंत हा मार्ग वाहनधारकांसाठी डोखेदुखी ठरत आहे. पेट्रोलपंपापासून या मार्गावर मोठमोठे जिवघेणे खड्डे पडले असून पैलवानबाबा मंदिर पासून हा मार्ग अक्षरक्ष: धुळीचा मार्ग बनला आहे.
हेही वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी
खड्डे व दगड यामुळे वाहनधारकांचा अपघात होत असुन गाड्याचे सुध्दा नुकसान होत आहे. अनेक वाहनधारकांना दुखापती झाल्या तर काहीच्या जिवावर बेतले आहे. एस.टी.असो की दुचाकीचा प्रवास जिव धोक्यात टाकून या धुळीचा मार्ग मार्गक्रमण कराया लागत आहे.
कित्येक वर्षापासून अकोट ते अकोला मार्ग रखडलेला आहे. या मार्गातील तांत्रिक कायदेशीर अडचणी असतील त्या नागरिकांसमोर संबंधित विभागाने जाहीर कराव्या, तसेच लवकर अकोट-अकोला मार्गाचे काम सुरू करावे अन्यथा पाच दिवसानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. याची जबाबदारी ही संबंधित विभागाकडे राहिल, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
हेही वाचा - अरे बापरे! प्राचार्यांनीच केली प्राध्यापिकेला शरीरसुखाची मागणी
विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोळ यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राम म्हैसने यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राम म्हैसने, शिवा गावंडे, शारदा थोटे, कैलास थोटे, वैभव पोटे व इतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(संपादन - विवेक मेतकर)