अत्यावश्यक सेवांसाठी कडक निर्बंधासह मुभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अत्यावश्यक सेवांसाठी कडक निर्बंधासह मुभा

अत्यावश्यक सेवांसाठी कडक निर्बंधासह मुभा

अकोला ः जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ९ मेच्या रात्री १२ वाजेपासून ते शनिवार (ता. १५) च्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध जारी केले आहेत. परंतु अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून काही बाबींना त्यातून मर्यादित मुभा देण्याचे त्यांना जारी केले आहेत. सदर आदेश १५ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहतील.

हेही वाचा: पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

या बाबींना मिळाली मुभा

- पेट्रोल पंप - ग्रामीण तसेच शहरी भागातील पेट्रोल पंपावरुन सकाळी ८ ते सकाळी ११ या कालावधीत केवळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे तसेच मालाची वाहतूक करण्याकरिता शहनिशा करुन ट्रॅक्ट्रर घेवून येणाऱ्या शेतकऱ्याला इंधन पुरवठा करता येईल.

- सर्व बॅंका ह्या रुग्णायलये, गॅस वितरण सेवा, ऑक्सिजन, औषधी, वैद्यकीय सेवा, मागणीनुसार पुरवठा व्हावा याकरिता संबंधित कंपनीच्या नावाने व्यवहार करण्याकरिता १२ ते १५ मेच्या सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान वेळ देण्यात येत आहे.

- दुरसंचार, टेलिकॉम सेवा (मोबाईल रिचार्ज सेंटर वगळता), विद्युत, पारेषण इत्यादी सेवासुरळीतपणे रहावी या करिता सेवा पुरविणारे कर्मचारी यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना कामे करता येतील. संबंधित आस्थापनानी त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहिल.

- धान्य वितरण प्रणाली सुरळीत सुरू राहण्यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतची वाहतूक अनुज्ञेय राहिल.

- वृत्तपत्र वितरण संदर्भानेवाहतूक अनुज्ञेय राहिल. त्यांना वितरीत केलेले ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहिल.

- कोषागार कार्यालय, म.रा.वि.वि.कं., विद्युत पारेषण पाणीपुरवठा व स्वच्छता, विद्युत पुरवठा, महाराष्ट्र जिवन प्राधीकरण, धरण व्यवस्थापन पाटबंधारे, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कृषी विभाग, पशुसंवंर्धन, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय तसेच अत्यावश्यक कामकाजाकरिताव कोविडचे अनुषंगाने कामकाज करण्यासाठी आवश्यक असणारे विभाग, कार्यालये ही सुरू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Web Title: Allowed With Strict Restrictions For Essential

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akola
go to top