Akola : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायलर; जिल्ह्यात आठ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

two arrested

Akola : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायलर; जिल्ह्यात आठ जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : त्रिपुराच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राहणेकरिता सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणाऱ्या आठ जणांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. याशिवाय संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो नागरिकांवरही पोलिसांनी कारवाई केली.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

अमरावती येथे घडलेल्या घटनेचे पडसाद अकोला येथे उमटले. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होवू नये म्हणून अकोला शहर व अकोट शहर येथे संचारबंदी लावण्यात आली. या काळातही काही समाजकंटक व्यक्तींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होवू शकेल असा धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह व जनप्रक्षोभक पोस्ट व्हायरल करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ता. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलिस स्टेशन अकोट फैलच्या हद्दीत एक आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतही एका आरोपीला अटक करण्यात आली होती.

दुसरे दिवस ता. १५ नोव्हेंबर रोजी जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. ता. १७ नोव्हेंबरला रामदासपेठ पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली. ता. २० नोव्हेंबरला अकोट शहरात दोन आरोपीला अटक करण्यात आली होती. अशाप्रकारे अकोला जिल्ह्यामध्ये सोशल मीडियामार्फत आक्षेपार्ह व जनप्रक्षोभक पोस्ट टाकणाऱ्या आठ गुन्हेगारांना अद्यापपावेतो अटक करण्यात आली आहे. सोशल मीडिया मॉनिटरींग सेल हे अकोला जिल्ह्यातील सर्व सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

१३४ जण स्थानबद्ध

अकोला शहरामध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जनक्षोभ पसरवू शकतात अशा १३४ संशयीत इसमांविरूध्द उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्पुरता स्थानबध्दता आदेश पारीत केला. शांतता भंग करणारे २० इसमांविरूध्द फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम १०७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. वारंवार शांतता भंग करणारे सहा इसमांविरूध्द फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ११० अन्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये १३९ व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आले आहेत. गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या १० इसमांना स्थानबध्द करण्यात आले आहे.

११० आस्थापना मंडळांना नोटीस

सामाजिक सलोखा कायम ठेवावा यासाठी पोलिसांनी लोकांच्या व आस्थापना चालकांच्या धर्मगुरू व पुजारी यांच्या २१३ बैठका घेवून त्यांना शांतता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय ११० आस्थापना मंडळांना सुरक्षिततेच्या नोटीस देण्यात आले आहेत. शहरामध्ये शांतता अबाधित रहावी व जनतेमध्ये विश्वास कायम रहावा म्हणून सहा वेळा रूट मार्च करण्यात आला. जिल्हाधिकारी, अकोला यांनी देखील सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करण्यास प्रतिबंध करणेबाबत ता. २० नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश पारीत केले आहेत.

loading image
go to top