आणखी ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

आणखी ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

अकोला ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ८५१ अहवाल प्राप्त झालेत. त्यातील ८२७ अहवाल निगेटीव्ह तर २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. रॅपिड अंटिजेनचे १३ रुग्णांसह एकूण ३७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. दरम्यान, १३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Another 37 corona positive patients in Akola)

आणखी ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
‘बीटी’च्या पाकिटातून प्रतिबंधित ‘एचटी-बीटी’ बियाण्यांची विक्री


बुधवारी दिवसभरात २४ अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यात १२ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात बार्शीटाकळी-पाच, अकोट-तीन, मूर्तिजापूर-तीन, तेल्हारा-सहा, अकोला-सात. (अकोला ग्रामीण-एक, अकोला मनपा क्षेत्र-सहा) आदी ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार, युनिक हॉस्पिटल येथील सहा, क्रिस्टल हॉस्पिटल येथील एक, थोटे हॉस्पिटल येथील एक, समर्पण हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल इंद्रप्रस्थ येथील एक, आयकॉन हॉस्पिटल येथील एक, ओझोन हॉस्पिटल येथील एक, डॉ.के.एस. पाटील हॉस्पिटल येथील दोन, केअर हॉस्पिटल येथील पाच, लोटस मल्टी. हॉस्पिटल येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील ११० असे एकूण १३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आणखी ३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; प्रतीक्षा संपली, 19 जुलैला मतदान



ॲक्टिव्ह रुग्ण ५०० च्या आता
जिल्ह्यातील १३७ रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आल्याने आता जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांंची संख्या ५०० च्या आता आली आहे. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ४८० जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Another 37 corona positive patients in Akola

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com