esakal | जेवण बनविण्याच्या कारणावरून मित्रानेच केली मित्राची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

जेवण बनविण्याच्या कारणावरून मित्रानेच केली मित्राची हत्या

जेवण बनविण्याच्या कारणावरून मित्रानेच केली मित्राची हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि.अकोला) ः अकोट तालुक्यातील पिंपरी जैनपूर शेत शिवारात मध्यरात्री जेवण बनविण्याच्या कारणावरून मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली. हत्या केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. त्याला पकडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे .

पिंपरी जेनपूर येथील गजानन नारायण बोदडे यांच्या शेतात गिरगोटी (ता चिखलदरा) येथील तीन मजूर संत्र्याच्या झाडाचे खोडे काढण्याचे काम करण्यासाठी आले होते. ता. १ मे रोजी मध्यरात्री त्यांनी मद्यपान केले.

यातच त्यांचा स्वयंपाक बनविण्याच्या कारणावरून वाद झाला. वादात एका मजुराला मारहाण केल्याने तो बाजूच्या शेतात गेला. नंतर दोघांमध्ये वाद झाल्याने प्रभू राजाराम बीकार याने मृतक शाबुलाल सुखलाल भुसुंम (वय अंदाजे ३२) याच्या डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले व तेथून तो पळून गेला.

रात्री बाजूच्या शेतात गेलेला मजूर सकाळी परत शेतात आल्यावर त्याला शाबुलाल भूसुम मृत अवस्थेत आढळून आला. त्याने याबद्दल मजूर कंत्राटदार शरिफोद्दीन नशीरोद्दीन (रा. अकोट) यांना माहिती दिल्यानंतर पोलिस पाटील, मजूर, शेतमालक व मजूर कंत्राटदार यांनी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन गाठले.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील आरोपी प्रभु बिकार हा पळून गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रभू बीकार यांचे विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला सोमठाणा येथून अटक केली. पुढील तपास अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन भगत करीत आहेत.

संपादन - विवेक मेतकर

loading image