प्रलंबित मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांचे आंदोलन

File Photo
File Photo

अकोला ः कोरोना काळात सार्वत्रिक लसीकरण व अन्य अत्यावश्यक कार्यात आपली सेवा देत असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलावर्गाचे मानधन व अन्य प्रलंबित मागण्यासाठी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला वर्गाने राज्यव्यापी आंदोलन प्रारंभ केले आहे. या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी यांना आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटना, अकोला वाशिम सीटूच्या वतीने निवेदन देण्यात आले. (Asha Swayamsevak's agitation for pending demands)

करोना महामारीच्या काळात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलांना रात्रंदिवस कर्तव्य करावे लागत आहे. प्रत्येक घरी जावून रुग्ण तपासणी, रिकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण मोहीम अंतर्गत शिबिर लावणे आदी काम करावे लागत आहेत. या व्यतिरिक्त शासनाच्या सर्व योजनांच्या सर्वेचे काम आशा व गट पर्यवेक्षिका देण्यात येत आहे. शासनाने या प्रलंबित समस्या त्वरित सोडविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.

File Photo
जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी चाचपणी सुरू

यावेळी आशा वर्कर्स व गट प्रवर्तक संघटना अकोला वाशिम सीटूचे अध्यक्ष राजन गावंडे, सचिव संध्या डीवरे, उपाध्यक्ष संतोष चीपडे, कोषाध्यक्ष रूपाली धांडे, रेणुका भारस्कर, बबीता जाधव, माधुरी पतंगे, संगीता खंडारे, पद्मा खोलगडे, अर्चना मानकर, अलका तायडे, उमा ईसायकर, अनिता वानखेडे, मिरा थोटे, रूपाली कोल्हे, आशा म्हसने, इंदुताई पाचपोहे, ज्योति पतोंड, सुकेशनी तायडे, सुमित्रा कांबळे समवेत बहुसंख्य आशा सेविका व गट प्रवर्तक उपस्थित होते.

File Photo
शेतकऱ्यांची फसवणूक करून होतेय बी-बियाणे व खतांची विक्री

या आहेत मागण्या
- आशा कर्मचारी यांना ३० जून २०२० रोजीच्या पत्रानुसार कोविड-१९ च्या कामाचे माहे ऑगस्ट २०१० पासून ४३३ रुपये रोज या प्रमाणे आदा करण्यात यावे.
- आशा कर्मचारी यांना ४ कामांवर आधारित एकत्रीत माहे ऑगस्ट २०२० पासूनचा मोबदला १६ सप्टेंबर २०१९ शासन निर्णया प्रमाणे ५ तारखेच्या आत अदा करावा.
- आशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांवर आधारित मोबदला प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत अदा करण्यात यावा. तशी पाचे पावती त्यांना देण्यात यावी.
- आशा कर्मचारी यांनी तयार केलेल्या अहवालाची दुय्यम (ओ.सी) प्रत देण्यात यावी.
- आशा कर्मचारी यांच्या अहवालात त्रुटी असल्यास त्रुटी पूर्ण करण्याकरिता २ दिवसांचा कालावधी देण्यात यावा, यासह इतर मागण्यांचा उपल्लेख करण्यात आला आहे.

File Photo
युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते

आयटकची महापालिकेसमोर निदर्शने
आशांच्या मागण्यांसाठी आयटक संघटक संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. १५) महापालिकेबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी आशांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आयुक्त यांच्या नावे माहपालिकेचे उपायुक्त जावळे यांना देण्यात आले. सदर आंदोलन आयटकचे नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनात आशा स्वयंसेविका मायावती बोरकर, छाया वारके, सविता प्रधान, बादल पवनिकर, प्रीति नाईसे, रेखा जोहरी, प्रज्ञा प्रधान, वैशाली पडसपगार, सुरेखा वाहने, सुजाता गंवई, संध्या गायकवाड, शालु नाईक उपस्थित होत्या.

Asha Swayamsevak's agitation for pending demands

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com