esakal | ‘अस्मिता लाल’ योजना; सॅनिटरी नॅपकिन मशीनचे अनुदान मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

‘अस्मिता लाल’ योजना; सॅनिटरी नॅपकिन मशीनचे अनुदान मिळणार

‘अस्मिता लाल’ योजना; सॅनिटरी नॅपकिन मशीनचे अनुदान मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः महिलांमध्ये उद्योजकता वाढावी (Entrepreneurship should increase among women) यासाठी महिला बटत गटांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन बनवून सदर नॅपकिन बाजारात विक्री करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत (Akola Zilla Parishad) सन २०१९-२० मध्ये अस्मिता लाल योजना (Asmita Lal Yojana) राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील सात महिला बचत गटांनी त्यासाठी भांडवल उभे करून सॅनिटरी नॅपकिन बनवण्याच्या मशीनसुद्धा विकत घेतल्या. परंतु सदर महिला बचत गटांना (women self help group) मशीन खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा एक रुपयाही जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आला नाही. शासनाने आता या बचत गटांना अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. (‘Asmita Lal’ scheme; Sanitary napkin making machine purchase grant will be given)

हेही वाचा: आजपासून ऑनलाईन भरणार 'अकोल्याची जत्रा'

महिला बचत गटांना व्यवसायाच्या संधी सोबतच रोजगार मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत आर्थिक वर्ष सन २०१९-२० मध्ये ‘अस्मिता लाल योजना’ राबविण्यात आली होती. योजनेअंतर्गत महिला बचत गटांची प्रत्येक तालुक्‍यात दोन याप्रमाणे सात तालुक्‍यातून १४ बचत गटांची लकी ड्रॉ (ईश्वर चिट्ठी) पद्धतीने निवड सुद्धा करण्यात आली होती.

हेही वाचा: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज ३०० च्यावर

अनुदान वितरणाच्या वेळी या नाविन्यपूर्ण योजनेसाठी सन २०१४ चा शासन निर्णय अडथळा ठरला होता. साहित्य खरेदी करूनही अनुदान मिळत नसल्याची बाब बचत गटाच्या महिलांनी जिल्हा परिषदचे अध्यक्षा प्रतिभाताई भोजने , उपाध्यक्षा सावित्रीबाई राठोड ,जि.प. माजी महिला व बालकल्याण सभापती मनिषाताई बोर्डे , जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार आणि महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विलास मरसाळे यांच्या लक्षात आणून दिली.

हेही वाचा: महाबिज बियाणे मिळेल पण, एका अटीवर

अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात योजना मार्गी लागण्यासाठी विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विलास मरसाळे यांनी पालकमंत्र्यांसह तत्कालीन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी समन्वय साधून शासन स्तरावर प्रयत्न केले. त्यानंतर योजनेला कार्योत्तर मंजुरी मिळवून घेतली आणि महिला बचत गटांना रखडलेले अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

संपादन - विवेक मेतकर
(‘Asmita Lal’ scheme; Sanitary napkin making machine purchase grant will be given)