...अन् रागाच्या भरात पेट्रोल टाकून पेटवून दिले; वाचा काळजाचा थरकाप उडवणारी घटना

प्रवीण राजपूत
Thursday, 10 September 2020

काशिनाथ उगले हा तिथे उभाच होता. भिसेने उगलेच्या अंगावर पेट्रोल टाकून माचिस लावून पेटवून दिले. यात उगले गंभीर जळाला. त्यास जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची तक्रार काशिनाथ राजाराम उगले याने ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे यांच्याविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूर (जि. बुलडाणा) : ‘प्यार और जंग में सब कुछ जायच है’ असे म्हणतात. मात्र, आता ही कहावत जुनी झाले आहे. प्यार और जंग हेच नाही तर दारूसाठीही काहीपण म्हणण्याची वेळ आता आली आहे. दारुडे दारू पिण्यासाठी कोणत्याही तळाला जायला तयार असतात. मग पत्नीचे दागिने गहाण ठेवायचे असो की घरातील भांडे त्यांचे हात थरकापत नाही. आता दारूच्या पैशांसाठी एकावर प्राणघातक हल्ला चढवल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवधाबा येथील काशिनाथ राजाराम उगले (वय ४५) याला दारूचे व्यसन आहे. तो गावातील अशोक गणपत भिसे यांच्या घरी दारू पिण्यासाठी गेला होता. त्याने भिसे याला दारू मागितली. मात्र, भिसे याने ‘उधारीचे दहा रुपये दे मग दारू देतो’ असे म्हटले. यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. उधरीचे दहा रुपये परत मिळत नसल्याचे पाहून अशोक भिसे रागारागात घरात गेला आणि बिसलरीच्या बॉटलमध्ये पेट्रोल आणले.

क्लिक करा - मित्राचे काकूशी अनैतिक संबंध; रंगेहात पकडल्याने केला खून

काशिनाथ उगले हा तिथे उभाच होता. भिसेने उगलेच्या अंगावर पेट्रोल टाकून माचिस लावून पेटवून दिले. यात उगले गंभीर जळाला. त्यास जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबतची तक्रार काशिनाथ राजाराम उगले याने ग्रामीण पोलिसांना दिली. ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे यांच्याविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच ग्रामीण पोलिसांनी अशोक भिसे यास अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

उगले याची प्रकृती चिंताजनक

दारूच्या उधारीचे १० रुपये परत मिळविण्यासाठी अवैध दारू विक्रेत्याने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना मलकापूर तालुक्यातील ग्राम देवधाबा येथे रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. उगले याची प्रकृती चिंताजनक असून, त्याला उपचारार्थ बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव तायडे करीत आहे.

हेही वाचा - संजय दत्तला झालेला कॅन्सर आहे तरी कोणता? कोणत्या व्यक्तींना आहे या कॅन्सरचा धोका? वाचा महत्वाची माहिती

अवैध धंद्यावाल्यांनी काढले डोके वर

मलकापूर तालुक्यात अवैध धंद्यावाल्यांनी डोके वर काढले आहे. ग्राम देवधाबा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री होत आहे. दारू विक्रेत्यांची उधारीचे पैसै वसूल करण्यासाठी माणसाला जाळण्यापर्यंत मजल पोहेचली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt to kill one in Buldana district