अरेरे काय ही हलगर्जी! क्वारंटाईन सेंटर बाहेरच घडत आहे असा प्रकार...वाचून व्हाल थक्क

सुगत खाडे
Monday, 8 June 2020

कोरोना संशयित व कोरोनाला हरवणाऱ्या रुग्णांना स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. हायरिक्स झोन किंवा सामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित असलेल्या सदर परिसरात अलगीकरण केंद्रा बाहेरच बायो मेडिकल वेस्टची होळी करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी कोविड केअर सेंटर म्हणून जाहीर करण्यात आलेल्या केंद्रावरुनच आता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

अकोला : कोरोना संशयित व कोरोनाला हरवणाऱ्या रुग्णांना स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. हायरिक्स झोन किंवा सामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित असलेल्या सदर परिसरात अलगीकरण केंद्रा बाहेरच बायो मेडिकल वेस्टची होळी करण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी कोविड केअर सेंटर म्हणून जाहीर करण्यात आलेल्या केंद्रावरुनच आता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

संसर्गामुळे होणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाला ब्रेक लावण्यासाठी शासन, प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यापैकी काही उपाययोजनांची अंमलबजावणी चोखरितीने होत आहे, तर काही उपाययोजनांची अंमबजावणी ही कागदावरच होत असल्याच्या बाबी समोर येत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रत्येक दिवशी वाढ होत आहे. दरम्यान कोरोना संसर्गाच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी कोरोनाबाधितांवर स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत आहे.

त्याठिकाणी सुद्धा रुग्णांना सुमार दर्जाच्या सुविधा देण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता कोविड केअर सेंटर म्हणून जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील मुलांच्या वसतीगृहाजवळूनच कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना संशयितांना अलगीकरणात ठेवण्यासाठी उपयोगात आणण्यात येत असलेल्या सदर वसतीगृहाबाहेरच आता बायोमेडिकल वेस्टची होळी करण्यात येत आहे. त्यामुळे सदर परिसरातूनच कोरोना संसर्ग वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

हेही वाचा - मोठी बातमी : रस्त्यांवर उद्यापासून दिसणार हा बदल...जाणून घ्या संपूर्ण माहिती

मास्क, ग्लोज व पीपीई कीट रस्त्यावर
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील कोविड केअर सेंटर पासून जवळच वापर केलेले मास्क, हॅंड ग्लोज व पीपीई कीट बेवारस पडून राहत आहेत. बायो मेडिकल वेस्ट असलेल्या या साहित्याची शनिवारी (ता. 6) परिसरातील खुल्या जागेवर होळी करण्यात आली. त्यामुळे बायो मेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्रशासनाची तत्परता दिसून येत आहे. 

इतरांना सुद्धा संसर्गाचा धोका
स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात बायो मेडिकल वेस्टची होळी करण्यात येत असल्याने त्यापासून इतरांना सुद्धा कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

प्रकरणाची चौकशी करु
कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना बायो मेडिकल वेस्ट डॉ. पंदेकृविच्या परिसरात फेकू नये, अशा सूचना दिल्या आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा परिसरात बायो मेडिकल वेस्टची होळी होत असल्यास प्रकरणाची चौकशी करू. 
- डॉ. निलेश अपार
उपविभागीय अधिकारी, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bio medical waste fire outside covid care center in akola