रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; रुग्णांचे ४६ इंजेक्शन विकले बाहेर

स्थानिक गुन्हे शाखेकडून आवळले फास; १९ जण ताब्यात
रेमडेसिव्हिरचा काळाबाजार; रुग्णांचे ४६ इंजेक्शन विकले बाहेर

अकोला ः कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार अकोल्यात सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समोर आणले. या प्रकरणात आतापर्यंत एका डॉक्टरसह १९ जणांना अटक करण्यात आली आहे. Black market of remedivir injection त्यांकडून ४६ रेमडेसिव्हिर इंजेक्शन काळाबाजार करीत बाहेर विकण्यात आल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बहुतांश दोन खासगी रुग्णालयातील निर्सिंग स्टाफ आहेत.

अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा रुग्णांना उपचारात लागणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन सहज मिळत नसल्याने याचा गैरफायदा अनेक जण घेत आहेत. अकोल्यात अनेक ठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहे. हा काळाबाजार करणाऱ्या १९ लोकांना एलसीबीने आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी हे बहुतेक खासगी रुग्णालयातील निर्सिंग स्टाफ आहेत. त्यांच्याकडून इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.

रुग्णांसाठी असलेले इंजेक्शन त्यांनी बाहेर प्रत्येकी २५ हजार रुपयांमध्ये विक्री करीत काळाबाजार केल्याचे समोर आले. यासंदर्भात ता. २३ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत बिहाडे हॉस्पिटल येथे पाच आरोपी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले.

चौकशीत हॉटेल रेजन्सी येथील कोविड हॉस्पिटलमध्ये सुद्धा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडून सहा इंजेक्शन बाहेर विकण्यात आल्याचे तपासात समोर आले. एकूणच हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कोविड रुग्णालयातील हॉस्पिटलमधून होत असलेल्या काळबाजाराची लिंक मोठी असल्याचे तपासात दिसून येत आहे.

त्यानुसार तपास करीत आतापर्यंत १९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी आणखी काही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. अन्य काही खासगी हॉस्पिटल व हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कोविड रुग्णालयावरही पोलिसांंची नजर आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com