ऐकावं ते नवलंच! लग्नाला उशीर झाला म्हणून वधू पक्षाने चक्क नवरदेवालाच हाकललं

वर्‍हाड्यांनाही दिला चोप ; बुलडाणा जिल्ह्यातील घटना
लग्न
लग्नsakal

साखरखेर्डा - अति उत्साही व पंगाडी तरुणांच्या नाचगाण्यामुळे नवरेवासह वराकडील वर्‍हाडी मंडळी लग्न मंडपात अति उशिरा आले. त्यामुळे वधू-वराकडील मंडळीत परस्परांत पेटलेल्या वादातून हळद लावलेल्या नवरदेवाला ओल्या हळदीसह लग्नमंडपातून बिना लग्नाचे घरी परतावे लागल्याची घटना सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथे घडली. या घटनेने लग्नासारख्या मंगलमयी कार्यात आजकालचे जे तरुण मद्यधुंद होऊन व कर्कश आवाजाच्या डीजेवर नाचगाणी करतात, लग्नात विघ्न ही येऊ शकते ही घटना त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. शिवाय अति शिष्टाचार आणि नाचगाण्यामुळे लग्न तुटू शकते हा त्यांच्यासाठी इशारा आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी येथील एका युवकाचे नातेवाईक असलेल्या परिसरातीलच मलकापूर पांगरा येथे लग्न ठरले होते. 23 एप्रिलला दुपारी लग्नाचा मुहूर्त होता. 23 एप्रिलला सकाळीच मलकापूर पांगारा येथील नवरी मुलगी ही साजश्रृंगार करून नवरदेवाची वाट बघत होती. सर्वत्र लग्नाची जोरदार तयारी करण्यात आली. मुहूर्त जवळ आल्याने बरीच पाहुणे मंडळी येऊन मंडपात बसली होती. मात्र नवरदेवच मंडपात येण्यास सातत्याने उशीर होत होता. नवरदेवाची मित्र मंडळी मद्यधुंद होऊन बॅण्डबाजाच्या तालावर नाचतच होती. दुपारी उशिरा गावात दाखल होऊन त्यानंतर काढलेल्या वरातीमुळे नवरदेव मंडपात यायला रात्रीचे 8 वाजले. त्याच वेळेस नवरीकडील मंडळींनी नवरदेव यायला उशिरा का झाला? म्हणून वराकडील मंडळीला विचारणा केली असता असे विचारताच वाद होऊन मुद्द्यावरून वाद गुद्द्यावर आला. आणि बघता बघता हातात स्वयंपाकाचे सराटे घेऊन वराकडील वर्‍हाडी मंडळीला वधूकडील मंडळींनी चांगलेच धुतले. त्यानंतर आमच्या मुलीचे तुमच्या मुलासोबत लग्न लावायचे नाही, अशी रोखठोक भूमिका घेत नवरदेवाला भर मंडपातून लग्न न लावताच ओल्या हळदीने आल्या पावली हाकलून देण्यात आले. त्यामुळे आनंदाच्या वातावरणात विरजण पडलेले बघायला मिळाले.

नवरदेवाचे दुसर्‍या मुलीसोबत तर नवरीचे दुसर्‍या मुलासोबत लग्न

वधूकडील मंडळींनी हळद लावलेल्या नवरीला ठेवायचे कसे म्हणून वधूपित्याने शोधाशोध करून दुसरबीड येथील नात्यातीलच एक मुलगा बघितला आणि रात्रीच त्याच्यासोबत वर -वधूचे शुभमंगल पार पाडले. तर दुसऱ्या दिवशी मुलाचेही दुसरी मुलगी पाहून लावून दिले. लग्न त्यानंतर दुसरे दिवशी सकाळीच कंडारी येथून वराकडील प्रतिष्ठित मंडळी मलकापूर पांगारा येथे येऊन तुम्ही असे का केले म्हणून विचारणा केली. त्यानंतर मान्यवरांनी मध्यस्थी करून नवरी मुलीला केलेले दागदागिने आणि मानाच्या साड्या परत केल्या. त्यामुळे वाढणारा वाद मिटला. त्यानंतर देऊळगाव कोळ येथील आत्याच्या मुली सोबत ओल्या हळदीने बसलेल्या नवरदेवाचा लग्नाचा बार शेवटी उडवून दिला. दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी शुभमंगल उरकले. अशा घटनेने समाजमन मात्र सुन्न झाले असून भविष्यात असे प्रकार होणार नाही यासाठी सर्वांनी सामाजिक भान राखले गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com