लाखो रुपयांची केळी फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ!

Buldana News Time for farmers to throw bananas worth lakhs of rupees!
Buldana News Time for farmers to throw bananas worth lakhs of rupees!

घाटबोरी (जि.बुलडाणा)  : मेहकर तालुक्यातील विश्वी येथील शेतकर्‍याने केळी पिकाची लागवड केली होती. परंतु, कोरोनाच्या संकटात कोणताही व्यापारी केळीला घेण्यासाठी तयार नाही. त्यामुळे शेतातच उभ्या केळीचे घड पिकून गळून पडत आहे.

डोक्यावर बँकेचे कर्ज असून कर्जबाजारी तसेच खासगी सावकाराकडून उसनवारी पैसे घेतले आहे. त्यामुळे केळी पिकाची शासनाने विल्हेवाट लावावी अन्यथा मजबुरीने मी आत्मदहन करणार अशा प्रकारचे निवेदन शेतकरी बबन सखाराम त्रिकाळ यांनी मेहकर तहसीलदार यांना २६ फेबु्रवारीला दिले.
कोरोनामुळे उद्भवलेली शेतकर्‍यांची अवस्था कठीण असून आजाराने थैमान घातले आहे.

काळजावर दगड ठेवून शेतकरी बबन सखाराम त्रिकाळ हे कवडीमोल भावात केळी विकण्यासाठी धडपड सुरू करीत आहे. केलेला लाखो रुपयांचा खर्चही निघणे दुरापास्त झाला आहे. कोराना व्हायरसने शेतकर्‍यांचे जीवनच अंधकारमय केले आहे.

लॉकडाऊनचा आता शेतीमालाला फटका बसू लागला आहे. केळी उत्पादकही अक्षरशः हतबल झाले आहेत. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळी डोळ्यादेखत फेकून देण्याच्या स्थितीत आली आहे. त्यामुळे हतबल होऊन शेतकरी बबन सखाराम त्रिकाळ यांनी मेहकर तहसीलदारांना निवेदन देत केळी पिकाची विल्हेवाट लावावी अन्यथा नाइलाजाने आत्मदहन करणार असा इशारा दिला आहे.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com