Buldana: सोयाबीनसह कापूस प्रश्नी आज मंत्रालयात बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soybean and cotton

बुलडाणा : सोयाबीनसह कापूस प्रश्नी आज मंत्रालयात बैठक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : सोयाबीन आणि कापूस प्रश्नांसह इतर मागण्यांबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन केले. सदर आंदोलन चिघळल्यानंतर राज्य शासनाने रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले. त्यासाठी २४ नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात दुपारी बैठक होऊ घातली आहे. बैठकीसाठी मंत्रिमंडळातील ९ मंत्री आणि संबंधित विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहे. यामध्ये शेतकर्‍यांच्या मागण्यांवर काय निर्णय होतो याकडे जिल्ह्यावासियांचे लक्ष लागले आहे.

सोयाबीन-कापूस प्रश्नावर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात विदर्भ व मराठवाडाव्यापी आंदोलन उभारण्यात आले होते. राज्य सरकारने तुपकरांना बैठकीचे निमंत्रण दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादा भुसे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

loading image
go to top