esakal | पोलिस कर्मचार्‍याचे दोन लाख रुपये पळविले
sakal

बोलून बातमी शोधा

In Buldana, a thief has snatched Rs 2 lakh from a police officer

घर बांधकामासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज मोटार वाहन विभागात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी संजय मिसाळ यांनी घेतले होते. त्यातील वॉल कंपाउंड बांधकामासाठी 17 डिसेंबरला शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून दोन लाख रुपये काढले. संजय मिसाळ पैसे घेऊन घराकडे जात असताना सुंदरखेड स्टेट बँकेसमोरील प्रियंका प्रोव्हिजनसमोर त्यांनी आपली दुचाकी भाजीपाला घेण्याकरिता थांबवली. भाजीपाला घेण्यासाठी थांबताच चोरट्यांनी मारला डल्ला. 

पोलिस कर्मचार्‍याचे दोन लाख रुपये पळविले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : दिवसाढवळ्या पोलिस कर्मचार्‍याची दोन लाख रुपयांची रक्कम चोरून पोबारा करण्याची घटना सुंदरखेड भागात घडली. घराला संरक्षक भिंती बांधण्याकरिता बँकेतून दोन लाख रुपये काढून पोलिस कर्मचारी घराकडे निघाले असता सुंदरखेड भागात भाजीपाला घेण्यासाठी थांबताच चोरट्यांनी दोन लाखांवर डल्ला मारला. पिशवीतील रक्कम चोरून चोरटे फरार झाले.

हे ही वाचा : बुलडाणा शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात 

घर बांधकामासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज मोटार वाहन विभागात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी संजय मिसाळ यांनी घेतले होते. त्यातील वॉल कंपाउंड बांधकामासाठी 17 डिसेंबरला शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून दोन लाख रुपये काढले. संजय मिसाळ पैसे घेऊन घराकडे जात असताना सुंदरखेड स्टेट बँकेसमोरील प्रियंका प्रोव्हिजनसमोर त्यांनी आपली दुचाकी भाजीपाला घेण्याकरिता थांबवली. भाजीपाला घेण्यासाठी थांबताच चोरट्यांनी मारला डल्ला. 

हे ही वाचा : पोफळी येथे वृद्धाने घेतला गळफास

यावेळी पैशाची पिशवी दुचाकीलाच लटकवलेली होती. संजय मिसाळ भाजी घेण्यासाठी खाली वाकले असता चोरट्यांनी दोन लाख रुपये चोरून नेले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पाठलाग केला. मात्र चोर हाती लागले नाहीत. शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पीएसआय सुधाकर गवारगुरु यांनी शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पडताळणी केली असता त्यात संजय मिसाळ यांचा पाठलाग करताना दुचाकीवर दोन व्यक्ती निदर्शनास आल्या. यावरून ते चोरटे बॅकेपासूनच त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे लक्षात येते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image