बुलढाणा : संग्रामपुरात राजकीय हालचालींना वेग; आघाडीत बिघाडी!

भाजपा आणि राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचे सूतोवाच केल्याने आघाडीतील बिघाडी येथे सुरुवातीलाच समोर आली आहे.
NCP BJP
NCP BJPesakal

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : नगर पंचायत निवडणूक जाहीर होताच संग्रामपुरात राजकीय हालचाली ना चांगलाच वेग आला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचे सूतोवाच केल्याने आघाडीतील बिघाडी येथे सुरुवातीलाच समोर आली आहे.

संग्रामपूर ग्रामपंचायतचे रूपांतर नगर पंचायतमध्ये होताच या ठिकाणी भारिप बमसच्या माध्यमातून चेतन घिवे यांनी मुसंडी मारत नगरपंचायतवर झेंडा लावला होता. ही बाब सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्याना खटकली म्हणूनच की काय वेगवेगळ्या हेतूने यात फूट पाडून भारिपला सत्ते पासून दूर ठेवण्यात विरोधकांना यश आले.

त्यानंतर राष्ट्रवादी आणि कांग्रेसने कसे बसे जुळवून घेऊन सत्ता काबीज केली. फुटीरतेच्या राजकारणामुळे सत्ता काबीज करणे हा मूलमंत्र घेऊन अजून नव्याने या ठिकाणी सामाजीक कार्याच्या नावाखाली काही जण सक्रिय झाले आहेत. सत्ताधारी पक्षाला ब्रेक लावून वेगळे सत्तांतर घडवून आणण्याचा आटोकाट प्रयत्नही या ठिकाणी केला जात आहे.

संग्रामपूर नगरपंचायतमध्ये १७ प्रभाग मिळून ५ हजार ४०९ इतकी मतदार संख्या आहे. मते मागताना ठोस अजेंडा काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, जुन्यांना कसेही करून थांबवा हा नवा फंडा घेऊन आतून प्रचार यंत्रणा राबविणे ही सुरू झाले आहे. गत वेळी पेक्षा यावर्षी निवडणूक रिंगणात ४ ते ५ पॅनल उतरणार अशी प्राथमिक माहिती आहे.

निवडणूक लढविण्याची इच्छा असणाऱ्यांची चाचपणी ही होत आहे. कोण कोणाकडून लढणार याची गुप्त हेरखोरी केली जात आहे. विकासाचे मुद्दे सोडून फक्त पाडापाडीची भाषा सद्या शहरातील राजकारण रंगत आहे. राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पदाचा चान्स भेटला होता म्हणून यावेळी नेत्यांना सत्तेचे डोहाळे लागल्याचे परवाच्या पालकमंत्री यांनी संग्रामपुरात जाहीर भाषणातून केलेल्या वक्तव्यावरून समोर आले आहे.

NCP BJP
शेतकऱ्यांची आणखी एक मागणी मान्य, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा!

राज्यात आघाडीची सत्ता असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आघाडी होणार असे वाटत होते. परंतु, खुद्द पालकमंत्री यांनीच एकला चलोरेचे भाष्य केल्याने कांग्रेस आणि सेना वेगळी पडली आहे. वास्तविक पाहता गतवेळी कांग्रेसकडे सर्वात जास्त नगरसेवक असतानाही राष्ट्रवादीला दोन नगरसेवकांवर नगराध्यक्ष पद भेटले ही राजकीय खेळी ठरली हा भाग वेगळा. त्याच कांग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी कडून स्वबळाची भाषा चर्चेचा विषय बनत आहे.

दुसरीकडे भाजपालाही मागील निवडणुकीत २ नगरसेवकावर समाधान मानावे लागले होते. त्याच भाजपाकडून आता ताकदीने १७ प्रभागात उमेदवार निवडणूक लढणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. तसे पाहले तर स्थानिक पातळीवर पक्षा पेक्षा उमेदवार कसा आहे याला जास्त महत्त्व दिले जाते. त्या नुसार सर्वच जण प्रभाग निहाय उमेदवार देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com