esakal | बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ‘एक गाव-एक गणपती’
sakal

बोलून बातमी शोधा

'एक गाव - एक गणपती'

बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यामध्ये ‘एक गाव-एक गणपती’

sakal_logo
By
गजानन काळुसे

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : कोरोनाचे सावट दोन वर्षांपासून सुरू असलेल्या लागोपाठ संकटांच्या मालिका सुरूच आहेत. अशा संकटांमध्ये सण-उत्सवांमधून काहीसे बळ मिळते. गणेशोत्सवामध्ये गावांत एकीचे बळ दिसावे, तसेच सामाजिक उपक्रमांना बळ मिळावे यासाठी पोलिसांच्या प्रयत्नातून तालुक्यामध्ये 'एक गाव - एक गणपती' संकल्पनेला बळ मिळत आहे.यावर्षी वर्षी ३५ गावांनी एक गाव एक गणपती साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: देवानंदचा १३५ दिवस मृत्यूशी संघर्ष; धोका टळलेला नाही

गांवात शांतता व सुव्यवस्था राहून सामाजिक सलोखा टिकावा तसेच भांडण ,तंटे नसावे, शिवाय  गांवात एकात्मतेची भावना वृद्धीगंत व्हावी या उदात्त हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून एक गांव एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येत आहे.तालुक्यातील सिंदखेड राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ३ गांवात एक गांव एक गणपती ,किनगांव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या १७ गांवात एक गांव एक गणपती तर साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या १५ गांवात एक गांव एक गणपतीची स्थापना केली आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले; पावसाने कपाशीच्या बोंड्या सडल्या

दरवर्षी दहा दिवसासाठी येणाऱ्या आणि भक्तांची सर्व विघ्ने दूर करणाऱ्या बाप्याच्या आगमनाची आतुरता अगोदर पासून दिसून आली होती.कोरोना संकटाने गांवामध्ये मर्यादा आल्या होत्या.परंतु आता परत एकदा गावाची एकी पुन्हा दिसणार कोरोना काळात गावा मध्ये कोव्हिड सेंटर उभारणे, रुग्णाच्या कुटुंबाला मदत देणे कोरोना रोखण्याच्या उपाययोजना यामुळे गावातील नागरीक कामाला लागले होते. 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना कामी येणार आहे. विघ्नहर्त्या गणेशाच्या आशीर्वादाने कोरोना रोखण्यासाठी गावकऱ्यांना पाठबळ मिळणार आहे.

हेही वाचा: शेगाव : श्रींचा १११ वा ऋषीपंचमी सोहळा होणार भक्तांविनाच

"गणेशोत्सव हा एक प्रमुख सण आहे. गणेशाच्या आगमनाने नवी ऊर्जा व चैतन्य मिळते. तिसऱ्या लाट येण्याची शक्यता असल्यामुळे कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्रिसूत्री म्हणजे मास्क,सोशल डिस्टंसिंग व हँड सॅनिटायझर वापर करणे गरजेचे आहे.गणेशोत्सव मंडळांनी समाजामध्ये कोरोना संदर्भामध्ये जनजागृती करून गणेश उत्सव साजरा करावा त्यामुळे गणरायाची खरी सेवा होणार आहे.कोरोना सारख्या महामारीतून बाहेर येण्यासाठी मदत होणार आहे."

- युवराज रबडे, ठाणेदार पोलिस स्टेशन किनगाव राजा

loading image
go to top