अकोला : सी.के. नायडू स्पर्धेसाठी विदर्भ संघात तीन खेळाडू

२५ वर्षांखालील खेळाडूंच्या संघाची घोषणा; नयन चव्हाणची प्रथमच निवड
C K Naidu cricket tournament Three players in Vidarbha  akola
C K Naidu cricket tournament Three players in Vidarbha akolasakal

अकोला : विजयवाडा येथे ता. २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या चार दिवसीय कर्नल सी.के.नायडू क्रिकेट स्पर्धेकरिता नुकतीच २५ वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये स्थानिक अकोला क्रिकेट क्लबचे आदित्य ठाकरे, नयन चव्हाण आणि गणेश भोसले या तीन खेळाडूंची विदर्भ संघात निवड झाली आहे. विदर्भ संघाचा पहिला सामना चंडीगड संघासोबत होणार असून, संघ ता. १७ मार्च रोजी विजयवाडाकरिता रवाना झाला आहे.

यापूर्वी मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे याने १६ व १९ वर्षाखालील विदर्भ संघ, तसेच न्यूझिलंड येथे झालेल्या १९ वर्षाखालील विश्‍व चषकात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून, याआधी २३ वर्षीय भारतीय संघातही त्याची निवड झाली आहे. अष्टपैलू नयन चव्हाण याने यापूर्वी १४, १६, १९ आणि २३ वर्षाखालील विदर्भ संघातचे आणि १९ वर्षाखालील भारतीय रेड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

फिरकीपटू गोलंदाज गणेश भोसले यानेही याआधी १६, १९ वर्षाखालील विदर्भ संघ, १६ वर्षाखालील मध्य विभाग, सय्यद मुश्‍ताक अली व विजय हजारे स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे. निवड झालेल्या खेळाडूंचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानू पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, ॲड. मुन्ना खान, गोपाळराव भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषदेचे सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, रवी ठाकूर, प्रशिक्षक सुमेद डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, शारीक खान, अभिजित मोरेकर, किशोर धाबेकर, एस.टी.देशपांडे यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com