नव्या बांधकाम प्रणालीने व्यावसायिक मेटाकुटीला!

‘बीपीएमएस’ ठरतेय डोकेदुखी
construction
constructionfile photo

अकोला ः बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली (बीपीएमएस) लागू झाल्यापासून घर बांधकाम करण्याकरिता परवानगी मिळविणारे मेटाकुटीला आले आहे. जानेवारी २०२१ पासून या प्रणालीतून अकोला महानगरपालिकेतर्फे परवानगीच मिळत नसल्याने बांधकाम व्यावसायिकांसोबतच सामान्य नागरिकांचीही डोकेदुखी वाढली आहे.
अकोला महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या कारभाराबाबत सातत्याने टिका होत आली आहे. ना कायस्वरुपी नगररचनकार आणि ना कार्यालयात अनुभवी कर्मचाऱ्यांची जोड. त्यामुळे बांधकाम परवानगी मिळविणे म्हणजे एक डोकेदुखीच आहे. परवानगी मिळत नसल्याने बँकांकडून गृह कर्ज मंजूर केले जात नसल्याच्या अडचणीही नागरिकांना येत आहेत. गेले दोन वर्षांपासून नागरिक परवानगी मिळविण्यासाठी महानगरपालिकेच्या पायऱ्या झिजवित आहे. मध्यंतरीच्या काळात शासनाच्या ऑनलाइन बांधकाम प्रणालीने नागरिकांना परवानगी मिळविताना अडचणी आल्यात. त्यामुळे शासनाने नवीन बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली लागू केली आहे. अकोला महानगरपालिकेनेही ही बीपीएमएस प्रणाली स्वीकारली. मात्र, त्यामुळे काम सुलभ होण्या ऐवजी अधिकच किचकट होत आहे.

बीपीएमएस प्रकल्प म्हणजे काय ?
राज्यातील महानगरपालिका व नगर परिषदेमध्ये विविध बांधकाम परवानगी प्रक्रियेचे प्रमाणन करण्याच्या दृष्टीने एक पोर्टल तयार करून बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणाली (बीपीएमएस) लागू करण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी आणि बांधकाम परवान्यांची अंमलबजावणी आणि नगरपरिषदेमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व कार्यप्रवाह आधारित प्रणालीसाठी प्लिंथ, ताबा इ. सारख्या वेगवेगळ्या प्रकारचे परवान्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व मनपा व नगर परिषदांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला.

जानेवारीपर्यंतच अपडेट
अकोला महानगरपालिकेने जानेवारी २०२१ पर्यंत १५३८ नवीन बांधकाम परवानगी दिल्याची माहिती संकेत स्थळावर दर्शविण्यात आली आहे. याशिवाय २६२ प्लिंथ लेव्हल परवानगी दिली आहे. मनपाकडे प्राप्त ऑनलाइन अर्जांपैकी ५८ टक्के परवानगी देण्यात आल्याचे संकेत स्थळावर दर्शविण्यात आले आहे. फेब्रुवारी, मार्च २०२१ ची माहितीच अपडेट नाही. याशिवाय उर्वरित ४२ टक्के बांधकाम परवानगी का स्थगित आहेत त्याची कारणेही देण्यात आली नाही. त्यामुळे यापूर्वी ऑनलाइन परवानगी घेणाऱ्यांना आता प्लिंथ लेव्हलच्या पुढे परवानगी मिळविताना अडचणी येत आहेत.

यापूर्वी शिबिरे घेवून दिल्यात परवानगी
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना घर बांधण्यासाठी आवश्यक परवानगी मिळविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे सन २०१९-२०२० मध्ये तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी दोन वेळा शिबिरे घेवून नागरिकांच्या परवानगीच्या प्रकरणांचा निपटारा केला होता. आता पुन्हा परवानगी देण्यासाठी नवीन आयुक्तांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com