माझा पती हरवला; आमदार नितीन देशमुखांच्या पत्नीची अकोल्यात तक्रार

Complaint of loss of husband of Nitin Deshmukhs wife in Akola
Complaint of loss of husband of Nitin Deshmukhs wife in AkolaComplaint of loss of husband of Nitin Deshmukhs wife in Akola

अकोला : जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी अकोला येथील सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार (Complaint) नोंदवली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे विधान परिषदेची निवडणूक झाल्यापासून नॉट रिचेबल आहेत. शिवसेनेच्या काही आमदारांचे फोनही बंद आहेत. तसेच बाळापूरचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचाही फोन सकाळपासून बंद आहे. (Complaint of loss of husband of Nitin Deshmukhs wife in Akola)

विधान परिषद निवडणुकीनंतर नितीन देशमुखही शिवसेनेच्या संपर्क क्षेत्रातून बाहेर गेलेल्या आमदारांसोबत सुरतला पोहोचले होते. तेथे त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (ता. २१) दुपारनंतर त्यांना पुन्हा एकनाथ शिंदे व इतर शिवसेना आमदार असलेल्या सुरतमधील हॉटेलमध्ये परत आणण्यात आले. दरम्यान, पत्नीचा संपर्क होत नसल्याने मंगळवारी दुपारी १ वाजता सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यामध्ये पती आमदार नितीन देशमुख हरविल्याची तक्रार (Complaint) दिली.

Complaint of loss of husband of Nitin Deshmukhs wife in Akola
अलका लांबा यांची पोलिसांशी बाचाबाची, रडत रडत रस्त्यावर झोपल्या

आमदार नितीन देशमुख हे गुरुवारी (ता. १६) रात्री विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाण्यासाठी निघाले. १७ जून रोजी ते मुंबईत पोहोचले. मुंबईतून अकोल्यासाठी निघत असल्याचे सोमवारी (ता. २०) सायंकाळी पत्नीला फोनवरून सांगितले. यानंतर पत्नीने फोन केला असता फोन बंद दाखवत होता. मंगळवारी (ता. २१) आमदार देशमुख हे अकोल्यात (akola) पोहोचणार होते. परंतु, ते पोहोचले नाही. तसेच मोबाइलही बंद आहे.

चिंतीत पत्नीने मुंबई येथील मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव गवळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे का, असा दाट संशय पत्नीने दिलेल्या पोलिस तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. पती नितीन देशमुख यांच्याशी संपर्क होत नसल्याने हरवल्याबाबत तक्रार नोंदवत आहे, असेही प्रांजली देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com