esakal | सायकल रॅलीकाढून कॉँग्रेसने केले आंंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल रॅलीकाढून कॉँग्रेसने केले आंंदोलन

सायकल रॅलीकाढून कॉँग्रेसने केले आंंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलींडरची सतत होत असलेली दरवाढ व वाढत्या महागाई विराेधात कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनाअतंर्गत कांॅग्रेसने सायकल रॅली काढत केंद्रातील माेदी सरकारचा निषेध केला. (Congress agitation against fuel price hike)

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. त्यामुळे डाळींसह भाजीपाल्यांच्या वाहतूक खर्चात वाढ झाला असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे. यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने महानगरात आंदोलन करण्यात आले. त्याअंतर्गत स्थानिक स्वराज्य भवन येथून गांधी चाैक, जुना कापड बाजार, टिळक राेड, गांधी राेड, मुख्य डाक घर यामार्गाने रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप सिव्हील लाईन चौकात करण्यात आला. रॅलीत कॉंग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी, मदन भरगड, साजिद खान पठाण, कपिल रावदेव, आकाश कवडे, रवी शिंदे, माे. इरफान, राजेश मते आदी सहभागी झाले हाेते.

पेट्राेलपंपाची प्रतीकृती उभारुन ताेडली
इंधन दरवाढ, वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी सिव्हील लाईन चौकात पेट्राेलपंपाची प्रतीकृती उभारुन ती ताेडली आली. सदर आंदोलन काँग्रेस नेते अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश युवक काँग्रेस महासचिव सागर कावरे यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. १२) सिव्हील लाईन्स चाैकात करण्यात आले. आंदाेलनात राजेश भारती, प्रकाश तायडे, पंकज देशमुख, दिनेश लोहोकार, अंकुश भेंडेकर, कार्तिक पोदाडे, सुजय ढोरे, भूषण चतरकर, अभय ताले, तुषार गावंडे, सागर ढोरे, प्रशांत वानखडे, पुष्पा देशमुख, महेश गणगणे, अंशुमन देशमुख, पराग कांबळे, महेंद्र गवई, गणेश कळसकर आदी सहभागी झाले हाेते.
-
वाहतूक विस्कळीत; पोलिसांची दमछाक
युवक कॉंग्रेसतर्फे सिव्हील लाईन्स चाैकात पेट्राेल पंपाची प्रतिकृती उभारून अनाेख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यामुळे चौकातील एका बाजूला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमली होती. रॅलीतून सहभागी झालेले कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सायकली सुद्धा चौकातील रस्त्यापर्यंत उभ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे यामार्गावरील वाहतूक संथ झाली हाेती. सदर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

Congress agitation against fuel price hike

loading image