
दुचाकीला दिले सायकलचे रूप!
अकोला - देशी जुगाड करण्यात भारतीयांचा कुणी हात पकडत नाही. त्यात वऱ्हाडातील अवलीया तर सर्वांत पुढे. असाच एक देशी जुगाड अकोल्यातील मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका अवलियाने केला. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतीवर पर्याय म्हणून त्याने चक्क आपल्या दुचाकी वाहनाचा सायकलमध्ये बदल केला. ही दुकीचे रुप घेवून अकोल्याच्या रस्त्यावर मिरविणारी सायकल सध्या अकोल्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
सरकारने प्रदूषणावर मात करण्यासाठी व इंधन टंंचाईवर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनां प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. त्यातच इंधनाच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या दरामुळे अकेकांचा कलही इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढतोय. मात्र, काही लोकांना परिस्थितीमूळ इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे परवडत नाही. त्यामुळे अनेकांनी आपल्या वाहनांमध्ये वेगवेगळे जुगाड केले आहेत., असाच काहिसा प्रकार अकोल्यातही पाहायला मिळाला.
अकोल्यात पेट्रोल दरवाढीमुळे मलकापूर परिसरामध्ये राहणारे प्रदीप माणिकराव घनबहादुर यांनी त्यांच्या दुचाकी स्कुटी वाहनात बदल करून त्याचे सायकलमध्ये रुपांतर केले. वरून दिसायला दुचाकी, मात्र सायकलचे रुप घेवून अकोल्याच्या रस्त्यावर धावणारी ही अनोखी सायकल पोलिसांच्या नजरेत पडली आणि संपूर्ण शहरात त्याची चर्चा सुरू झाली. या दुचाकी वाहनचं इंजन आणि इतर पार्ट काढून त्यामध्ये सायकलचे पार्ट्स, सायकलचं रिंग-टायर, चेन सिस्टीम, फायडल यासारखे वस्तू बसविण्यात आल्यात. आता प्रदीपराव त्यांच्या स्कुटी सायकलने अख्ख शहर फिरत आहे. त्यांचा स्कुटीचा हा जुगाड पाहून अनेक लोक त्यांचं कौतुकही करत आहेत. शहर वाहतूक पोलिसांची नजर या गाडीवर गेली आणि गाडीचे बदलेले रुप बघून व प्रदीपरावच्या या देशी जुगाडाने त्यांनाही आश्चर्यचकित केले.
वाहनातील असा बदल ठरू शकतो धोकायादक
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांच्या मुळ स्थितीत कोणताही बदल करता येत नाही. तसे करणे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वाहन कायद्याचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Web Title: Conversion Of Two Wheeler To Bicycle Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..