अकोला; आणखी नऊ रुग्णांचा मृत्यू; २७० नवे रुग्ण आढळले

अकोला; आणखी नऊ रुग्णांचा मृत्यू; २७० नवे रुग्ण आढळले

अकोला : कोरोना संसर्गामुळे (Corona Virus) होणाऱ्या कोविड १९ (Covid19) रोगाने ग्रस्त नऊ रुग्णांचा शुक्रवारी (ता. २८) मृत्यू झाला. त्यासोबतच २७० नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ४३० जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सध्या जिल्ह्यात ५ हजार १२७ नवे रुग्ण आढळले आहेत. (Corona Cases in akola corona positive patient and death)


कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. २८) जिल्ह्यात एक हजार ८२९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ६२४ अहवाल निगेटिव्ह तर १९५ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत ७५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत २७० नव्या रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या चाचणीत ८२ महिला व ११३ पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात मूर्तिजापूर तालुक्यातील ३८, अकोट-२७, बाळापूर-१६, बार्शीटाकळी-६, पातूर-९, तेल्हारा-३१, अकोला ग्रामीणमधील १४ तर मनपा क्षेत्रातील ५४ रुग्णांचा समावेश आहे.

असे आहेत मृतक
बाळापूर येथील ५८ वर्षीय पुरुष, जिल्हा परिषद कॉलनी येथील ७५ वर्षीय महिला, मार्डी ता. अकोट येथील ६५ वर्षीय पुरुष, लहान उमरी येथील ७५ वर्षीय महिला, तळेगाव पातुर्डा ता. तेल्हारा येथील ५५ वर्षीय पुरुष, कृषी नगर येथील ७० वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ८० वर्षीय पुरुष, येरंडा ता. बार्शीटाकळी येथील ७० वर्षीय महिला, अकोट येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ५५०६२
- मयत - १०५६
- डिस्चार्ज - ४८८७९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५१२७

संपादन - विवेक मेतकर

Corona Cases in akola corona positive patient and death

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com