आणखी ११ जणांचा मृत्यू; ७१४ नवे पॉझिटिव्ह

आणखी ११ जणांचा मृत्यू; ७१४ नवे पॉझिटिव्ह
आणखी ११ जणांचा मृत्यू; ७१४ नवे पॉझिटिव्ह

अकोला ः कोरोना संसर्गामुळे Corona infection शुक्रवारी (ता. ७) जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच ७१४ नवे रुग्ण आढळले. त्यासोबतच ४८८ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. सध्या जिल्ह्यात ६ हजार ४०२ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. Corona kills 11 more; 714 New Positive

कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. ७) जिल्ह्यात २ हजार ६४७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार ११६ अहवाल निगेटिव्ह तर ५३१ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिडच्या चाचणीत १८३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ७१४ रुग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या चाचणीत २०९ महिला व ३२२ पुरुषांचा समावेश आहे. मूर्तिजापूरमध्ये २२, अकोट-११६, बाळापूर-३७, तेल्हारा-२८, बार्शीटाकळी-३८, पातूर-४९, अकोला ग्रामीणमध्ये ८८ तर अकोला महापालिका क्षेत्रात १५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

असे आहेत मृतक

उरल येथील ७० वर्षीय पुरुष, बाळापूर येथील ७१ वर्षीय महिला, डाबकी रोड येथील ७४ वर्षीय पुरुष, पातूर येथील ६० वर्षीय पुरुष, मोठी उमरी येथील ५६ वर्षीय पुरुष, अकोट फैल येथील ६२ वर्षीय पुरुष, खदान येथील ८० वर्षीय महिला, रणपिसे नगर येथील ४५ वर्षीय पुरुष, अकोट येथील ५० वर्षीय पुरुष, म्हैसपूर येथील ७५ वर्षीय महिला, डोंगरगाव येथील ६० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ४४५१५

- मयत - ७६५

- डिस्चार्ज - ३७३४८

- ॲक्टिव्ह रुग्ण - ६४०२

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com