Corona Update : कोरोना मुक्तीकडे; जिल्ह्यात एकही रुग्ण नाही

४५ अहवाल निगेटिव्ह; ॲक्टिव्ह रुग्णही शून्य
Corona update akola 45 reports negative Active patients are also zero health
Corona update akola 45 reports negative Active patients are also zero healthSakal

अकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. ६) ४५ अहवाल प्राप्त झाले. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे ६६ हजार ९६ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. जिल्ह्यात मार्च २०२० पासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली.

सुरूवातीला महानगरात आढळलेले कोरोना विषाणूग्रस्त नंतरच्या काळात ग्रामीण भागात सुद्धा आढळले. त्यामुळे जुलै २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमानं घातलं. सप्टेंबर २०२० महिन्यात तर कोरोनाचा आलेख उच्चांकीवर होता.

नंतरच्या काळात मात्र कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली. त्यामुळे रेड झोनमध्ये असलेला जिल्हा ग्रीन झोनमध्ये गेला होता. रुग्णसंख्या घटल्याने कोरोनाची पहिली लाट ओसरल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाची डोकेदुखी वाढली. एप्रिल, मे २०२१ या महिन्यात तर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान घातल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाने कडक पाऊल उचलत नागरिकांवर निर्बंध लावले.

कोरोना संसर्गाचा ग्राफ खाली

ऑगस्ट, सप्टेंबर २०२१ पासून कोरोना संसर्गाचा ग्राफ खाली येत गेला. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यानंतर विदेशात ओमायक्रॉनचा धोका वाढला. त्यामुळे कोरोनीची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु कोरोनाचे व्यापक लसीकरण, प्रशासकीय निर्बंध व नागरिकांच्या जागरूकतेमुळे कोरोनाचा अधिक फैलाव होऊ शकला नाही.

त्यानंतर कोरोनाचे रूग्ण जास्त प्रमाणात आढळू शकले नाही. दरम्यान, बऱ्याच दिवसानंतर आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, त्यासोबत एकही सक्रिया रुग्ण भरती नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com