esakal | कोरोनाचा धोका वाढताच, आणखी आठ बळी

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा धोका वाढताच, आणखी आठ बळी
कोरोनाचा धोका वाढताच, आणखी आठ बळी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त ८ रूग्णांचा मंगळवारी (ता. २०) बळी गेला. त्यासोबतच ४८२ नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ५७५ झाली असून एकूण ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ४ हजार ९९३ झाली आहे.


कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. २०) १ हजार ७२७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार ४४६ अहवाल निगेटिव्ह तर २८१ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरिक्त रपिडच्या चाचणीत २०१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांच्या संख्येत ४८२ रूग्णांची भर पडली. आरटीपीसीआरच्या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या २८१ अहवालांमध्ये १११ महिला व १७० पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी १५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मिळाली आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

महापालिकेत आढळले सर्वाधिक रूग्ण
मंगळवारी (ता. २०) मूर्तिजापूर तालुक्यात १८, अकोटमध्ये पाच, बाळापूरात १६, तेल्हारामध्ये १५, बार्शीटाकळीमध्ये नऊ, पातूर तालुक्यात सहा, अकोला ग्रामीण मध्ये ३३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १७९ अहवाल पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा: 'नितेश राणे हे बेडकांचे पिल्लू आहे', आमदार पुन्हा बरसले

 • असे आहेत मृतक

 • - पहिला मृत्यू खिरपूरी ता. बाळापूर येथील ८१ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास ७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.

 • - दुसरा मृत्यू खडकी येथील ७५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १८ रोजी दाखल करण्यात आले होते.

 • - तिसरा मृत्यू म्हैसांग येथील ५१ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास १५ रोजी दाखल करण्यात आले होते.

 • - चौथा मृत्यू रिधोरा ता. बाळापूर येथील ७७ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १५ रोजी दाखल करण्यात आले होते.

 • - पाचवा मृत्यू मलकापूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास १९ रोजी दाखल करण्यात आले होते.

 • - सहावा मृत्यू मूर्तिजापूर येथील ५३ वर्षीय महिलेचा झाला. या रुग्णास १९ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते.

 • - सातवा मृत्यू ४५ ते ५० वयोगटातील अज्ञात पुरुषाचा झाला. या रुग्णास १९ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते.

 • - आठवा मृत्यू रिधोरा ता. बाळापूर येथील ८० वर्षीय पुरुषाचा झाला. या रुग्णास ११ रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा: जुन, जुलै महिन्यात असा असेल पाऊस

 • कोरोनाची सद्यस्थिती

 • - एकूण पॉझिटिव्ह - ३४६८३

 • - मयत - ५७५

 • - डिस्चार्ज - २९११५

 • - ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - ४९९३

संपादन - विवेक मेतकर