esakal | मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांसाठी वाहने भाड्याने घेणार

बोलून बातमी शोधा

मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांसाठी वाहने भाड्याने घेणार

मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांसाठी वाहने भाड्याने घेणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

अकोला ः महानगरपालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी वाहने भाड्याने घेण्यास गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

मनपाकडे स्वतःची वाहने नसल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांकरिता वाहने पुरवठा करण्यासाठी ई-निविदा मागविण्यात आली. त्यानुसार सर्वात कमी दरमाने वाहने पुरवठा करण्यासाठी सादर करण्याता आलेल्या निविदेला गुरुवारी दुपारी ऑनलाईन झालेल्या सभेत स्थायी समितीने मंजुरी दिली.

वाहने भाड्याने घेताना नियमांचे पालन होत नसल्याबाबत सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा, काँग्रेसचे पराग कांबळे, मो. इरफान आणि भाजपचे विजय इंंगळे यांनी याबाबत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, कोणत्याही सदस्यांना मोटार वाहन विभागाचे प्रमुख समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. अखेर सभापती संजय बडोणे यांनी प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी घेत हा विषय मंजूर केला. त्यापूर्वी स्थायी समितीकडून अंदाजपत्रक व इतर विषयांना मंजुरी देण्यासाठी एप्रिलच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले.

कंत्राटी कर्मचारी पुरवठा कंपनीचा मुद्दा पुन्हा गाजला

मनपाला कंत्राटी कर्मचारी पुरवठा करणाऱ्या कंपनीचा मुद्दा पुन्हा स्थायी समितीच्या सभेत गाजला. शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी सध्या काम करीत असलेल्या कंपनीला नियमाबाह्यरित्या मुदतवाढ दिल्याबद्दल आक्षेप घेतला. याशिवाय क्षीतिज कंपनीला टावल्याजात असल्याबाबत सत्ताधाऱ्यांना जाबही विचारला. याविषयावर सत्ताधाऱ्यांनी अधिक चर्चा करण्याचे टाळून दोन्ही सभेचे इतिवृत्त मंजूर केले.

संपादन - विवेक मेतकर