चिंता वाढली...! नऊशेकडे आगेकूच; पुन्हा एक बळी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे सोमवारी (ता. 8) एका 45 वर्षीय पुरूषाचा उपचार घेताना मृत्यू झाला. त्यासोबतच आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांमध्ये सतत वाढ होत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 821 झाली आहे. त्यात रोजच भर पडत असल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची आगेकूच नऊशेकडे होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र 243 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरच उपचार घेत आहेत. 

अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनामुळे सोमवारी (ता. 8) एका 45 वर्षीय पुरूषाचा उपचार घेताना मृत्यू झाला. त्यासोबतच आठ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांमध्ये सतत वाढ होत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 821 झाली आहे. त्यात रोजच भर पडत असल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची आगेकूच नऊशेकडे होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र 243 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरच उपचार घेत आहेत. 

देशभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने जिल्ह्यात सुद्धा धुमाकूळ घातला आहे. कोरोना संसर्गामुळे सोमवारपर्यंत (ता. 8) जिल्ह्यात 821 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अकोला शहर व जिल्हा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 38 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. त्यामधील एका रुग्णांने आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी 821 चा आकडा गाठला असला तरी 540 रुग्णांनी कोरोनावर मात सुद्धा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 243 रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. 

हे ही वाचा : अरेरे काय ही हलगर्जी! क्वारंटाईन सेंटर बाहेरच घडत आहे असा प्रकार...वाचून व्हाल थक्क

एक महिला व सात पुरूषांची भर
कोरोना रुग्णांचे सोमवारी (ता. 8) 60 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 8 अहवाल पॉझिटिव्ह तर 52 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या अहवालांमध्ये एक महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दोन रुग्ण रजपुतपूरा येथील रहिवासी आहेत, तर उर्वरित बेलोदे ले-आउट, नीता गेस्ट हाऊस कलाल की चाल, अकबर प्लॉट अकोट फ़ैल, हनुमान बस्ती संतोषी माता मंदिर, माळीपूरा, गायत्री नगर येथील प्रत्येकी एक-एक जण रहिवासी आहेत.

३८ रुग्णांचा बळी
कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी (ता. ८) सुद्धा मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णामध्ये नायगाव येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. सदर रुग्ण ३ जून रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. त्याचा सोमवारी (ता. ८) पहाटे उपचार घेताना मृत्यू झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID-19 : one dead again; Eight new corona positives in akola