अकाेला : विविध गट निर्माण करा; आर्थिक उत्थान सुरू करू - बच्चू कडू

पालकमंत्री बच्चू कडू : मूर्तिजापुरात दिले उच्चस्तरीय प्रतिनिधींना निर्देश

Create different groups Let start financial upliftment Bachchu Kadu
Create different groups Let start financial upliftment Bachchu Kadu

मूर्तिजापूर : वेगवेगळ्या स्तरातील आर्थिक दूर्बल घटकांचे वेगवेगळे गट तयार करा, महिनाभरात कार्यक्रम तयार करा, महिनाभराने एकत्रीत बसून शेतकरी, शेतमजूर, लघुव्यावसायिक, कामगारांच्या आर्थिक उत्थानाचा कार्यक्रम निश्चित करू असे, निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी विविध फायनान्स कंपन्यांच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींना दिले.

येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.२५) सकाळी १० वाजता आयोजित खासगी पतपुरवठा संस्था, फायनान्स कंपन्या, सावकारी कर्जवाटप व वसुली संदर्भातील आढावा बैठकीत विविध वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना ते बोलत होते.

जिल्हाधिकारी नीमा अरोरा, उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते व अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी आर्थिक गरजवंतांची गरज लक्षात घ्या, आम्ही मदत करतो, ज्यामुळे आर्थिक समतोल आधिक चांगल्या पद्धतीने साधता येईल असा, विश्वास वित्तीय संस्थेच्या प्रतिनिधींना दिला. गाय, बकरी, कुक्कूट अशा, विविध व्यावसायिकांचे गट, एक व्यवसाय गट, असा कार्यक्रम किती दिवसात तयार करता? असा प्रश्न विचारून १५ दिवसानंतर एक बैठक घ्या, नंतर आपण चिंतन-मंथन करू. एकदम गरीब असतील त्यांचा ‘अ’ आणि ‘ब’ म्हणजे बरा असणाऱ्यांचा गट अशी मखलाशीही त्यांनी यावेळी केली. शहरातील असा संपूर्ण डाटा तयार करून देण्याविषयीचे निर्देश पालकमत्र्यांनी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांना दिले. सर्व तयारी झाल्यानंतर आपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन गरजवंतांच्या आर्थिक उत्थानाचा कार्यक्रम तयार करू असे, पालकमत्र्यांनी सांगीतले.

सॕटिन क्रेडीट केअर नेटवर्कचे मोहनीश गजभिये, सपना गावंडे, किशोर बनसोड, अमोल खाजोने, माहतब आलम, त्र्यंंबक मांगर, सुमंत चरपे, अंजनीकुमार आदी वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. तहसीलदार प्रदीप पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बैठकीचे नियोजन केले. त्यानंतर विविध समस्यांची निवेदने पालकमंत्र्यांनी स्विकारले व कर्तव्य यात्रा रथाला हिरवी झंडी दाखवून त्यांना जांभा बुद्रुकला प्रस्थान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com