Crime News : लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला नेले होते पळवून; आरोपीला १० वर्षांचा शिक्षा

Crime
CrimeSakal

अकोला : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखऊन पळून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषींला १० वर्ष सक्तमजुरी व पाच हजार दंडाची शिक्षा ठोठावली. नाजीम उर्फ नदीम मोहम्मद हुसैन (वय २७ वर्षे, रा. जयराम सिंग प्लॉट जुने शहर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

Crime
Anand Sagar : भाविकांसाठी खुशखबर! शेगावातील 'आनंद सागर' आध्यात्मिक केंद्र सुरू होणार, पण...

आरोपी नाजीम उर्फ नदीम मोहम्मद हुसैन (वय २७ वर्षे रा. जयराम सिंग प्लॉट जुने शहर) याने एका अल्पवयीन मुलगीला लग्नाचे आमीष दाखऊन पळून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या आईने जुने शहर पोलिस स्टेशनला २६ जून २०१७ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.

तत्कालिन तपास अधीकारी पोउपनि शामराव तायडे, तत्कालिन उपविभागीय पोलिस अधीकारी राजेंद्र मनपरे, उमेश माने पाटील यांनी तपास करून आरोपी विरुद्ध दोषारोपी पत्र न्यायप्रविष्ट केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदारांचे साक्षी नोंदविण्यात आल्या व आरोपीतर्फे २ बचावाचे साक्षीदार तपासण्यात आले.

Crime
Vajramooth Sabha : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा रद्द; जयंत पाटील

साक्षी व पुरावे असा दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीस दोषी ठरविण्यात आले. याप्रकरणी दोषींला कलम ३७६ (२), भादंविसह कलम ३, ४ पोक्सो ॲक्ट अंतर्गत १० वर्षे सक्त मजुरी व पाच हजार दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. राजेश अकोटकर यांनी काम पाहिले व पैरवी अधिकारी पोलिस अमंलदार फजलुर रेहमान काझी, महिला पोलिस अमंलदार वैशाली कुंबलवार यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com