नोकरी लावून देतो म्हणून युवकाची फसवणूक

एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
 crime update Punjabrao Deshmukh Agricultural University fraud with job seeker youth akola
crime update Punjabrao Deshmukh Agricultural University fraud with job seeker youth akolasakal

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील जैविक शेतकरी मिशन येथे लिपिक पदाची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या युवकाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील उमरदरी येथील रविंद्र हा युवक नोकरीच्या शोधात होता. त्याने ता. २ मार्च रोजी डाॅ. पंजाबराव कृषी विद्यापीठातील जैविक शेतकरी मिशन येथे लिपीक पदासाठी मुलाखत दिली. तीन दिवसानंतर युवकाच्या एका मित्राचा फोन आला व त्याने लिपिक पदासाठी दिलेल्या मुलाखतीत पास करण्यासाठी गजानन ठोसर नावाची व्यक्ती मदत करणार असल्याचे व त्याच्याशी मी बोललो असल्याचे सांगितले.

तुझा नंबर दिला असून, त्याच्याशी बोलण्यास सांगितले. त्यानुसार गजानन ठोसरने युवकाला फोन केला व मुलाखतीत पास करून देतो त्यासाठी सात लाख रुपये आणून दे असे समरोच्या व्यक्तीने रविंद्रला सांगितले. नोकरी लागेल या आशेने युवक त्याला भेटण्यासाठी विद्यापीठात गेला. तेथे गजानन ठोसर व त्याचा मित्र प्रशांत जोगदंडची भेट झाली. त्यांनी नोकरी लावून देण्यासाठी सुरुवातीला साडेतीन लाख रुपये मागितले.

युवकाकडे एवढी रक्कम नसल्याने त्याने एक लाख ६० हजार रुपये त्याच्या मित्रासमोर दिले. ही रक्कम वरिष्ठांना द्यावी लागते असे म्हणून रक्कम घेऊन दोघेही निघून गेले व संध्याकाळी पाच वाजता भेटले असता आता उशीर झाला उद्या आर्डर देऊ असे म्हणून ते निघून गेले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते दोघेही युवकाला भेटले व त्यांच्याच मोबाइलवरून ऑर्डर दाखवली. ही ऑर्डर खोटी असल्याचे युवकाचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंविचे कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com