फसवणुकीतील आरोपी हिरवेचा शोधासाठी पथक

महिलांची कोट्यवधीची फसवणूक; पुणे व परिसरात घेणार शोध
crime update Squad to find Ajit Hirve of fraud case of women akola
crime update Squad to find Ajit Hirve of fraud case of women akolasakal

अकोला : महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली फॅन्सी बटन बनवण्याची मशीन आणि कच्चा माल पुरवून दीड हजार निराधार महिलांची एक कोटी ३२ लाखाने फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. यामध्ये अटक करण्यात आलेली अकोल्यातील महिला एजंट संगीता चव्हाण हिच्या चल, अचल व स्थावर संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेने माहिती गोळा केली आहे. याशिवाय या प्रकरणातील आरोपी कंपनीचा संचालक अजित हिरवे शोधासाठी पोलिसांचे पथक गठीत करण्यात आले असून, या ठकबाजाचा शोध घेण्यासाठी पथक पुणे व सातारा येथे जाणार असल्याची माहिती आहे.

पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कार्पाेरेशन महिला स्वयंरोजगार कंपनीचा संचालक आणि सातारा येथील राधाकृष्ण सेल्स कार्पोरेशनचा मॅनेजिंग डायरेक्टर अजित हिरवे याने महिलांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये लाटले. यामध्ये अकोल्यातील एजंट संगीता चव्हाणने जिल्ह्यात १२०० महिलांची साखळी तयार करून त्यांच्याकडून पैसे गोळा केले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने केल्या तपासणानुसार तिघांविरुद्धही खदान पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केले व सूत्रधार आरोपी संगीता चव्हाणला अटक केली. तपासात चव्हाणच्या संपत्तीची माहिती गोळा करण्यात आली आहे. चव्हाण ही कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत असून, तिच्याकडे एक चार चाकी गाडी व दोन मोटारसायकली आढळल्यात. इतर संपत्तीची माहिती घेण्याचे काम पोलिस करीत आहेत.

हिरवेच्या अटकेनंतरच येणार सत्य बाहेर

पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कार्पाेरेशन महिला स्वयंरोजगार कंपनीचा संचालक आणि सातारा येथील राधाकृष्ण सेल्स कार्पोरेशनचा मॅनेजिंग डायरेक्टर अजित हिरवे हा फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहे. त्यासाठी पथकही गठीत करण्यात आले. हे पथक लवकरच पुणे, सोलापूर येथे हिरवेचा शोध घेणार आहे. हिरवेच्या अटकेनंतरही या फसवणूक प्रकरणातील सत्त बाहेर येईल. त्यासाठी पोलिसांनी हिरवेच्या अटकेसाठी कसोशिने प्रयत्न करण्याची गरज आहे.

फसवणुकीतील धागेदोरे शोधण्यात अडचणी

महिलांना रोजगाराच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारी एजंट संगीता चव्हाणकडे पोलिसांना तपास करूनही फारशी संपत्ती आढळली नाही. ती स्वतःही कंपनीच्या व्यवस्थापकाच्या भूलथापांमध्ये अडकून फसवल्या गेली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शोध घेताना पोलिसांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिवाय फसवणूक झालेल्या महिलांचे पैसे परत मिळावे यासाठी आरोपीची संपत्ती जप्त करण्यासाठी पोलिसांनी चाचविलेल्या प्रयत्नांना यश येताना दित नाही. त्यासाठी सोशल मीडियावर व्यापक मोहीम राबविली जात आहे.

न्यायालयासमोर आज करणार हजर

फसवणूक प्रकरणातील आरोपी संगीता चव्हाण हिला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ता. १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. तिची पोलिस कोठडी शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे उद्या तिला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com