अकोला : अवैध नळ जोडणी आढळल्यास फौजदारी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध नळ जोडणी

अकोला : अवैध नळ जोडणी आढळल्यास फौजदारी कारवाई

अकोला - महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये बऱ्याच नागरिकांनी पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी मनपाची परवानगी न घेता अवैध नळ जोडणी केलेली आहे. यामुळे मनपाव्‍दारे शहरात करण्‍यात येणाऱ्या पाणी पुरवठेच्‍या नियोजनामध्‍ये अडचण निर्माण होत आहे. ते बघता अवैध नळ जोडणी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. शहरातील अवैध नळ जोडणी घेणाऱ्यांनी आठवड्याच्‍या आत त्यांच्याकडे असलेली अवैध नळ जोडणी वैध करून घेण्यासाठी महानगरपालिकेतील जलप्रदाय विभागाशी संपर्क साधावा. आवश्यक फी भरून वैध करून घ्‍यावी. अन्‍यथा पुढील आठवड्यापसून अकोला महानगरपालिकेव्‍दारा अवैध नळ जोडणी आढळल्‍यास त्‍यांची नळ जोडणी खंडीत करून त्‍यांचे विरूध्‍द संबंधित पोलिस स्‍टेशनमध्‍ये फौजदारी स्‍वरूपाचे गुन्‍हे दाखल करण्‍याची कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा महानगरपालिका प्रसासनाने दिला आहे. ही अप्रिय कारवाई टाळण्यासाठी अवैध नळ जोडणी वैध करून घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले.

अशी करता येईल नळ जोडणी वैध!

नळ जोडणी घेण्‍यासाठी छापील अर्ज, चालू वर्षाचा मालमत्‍ता कर भरल्‍याची पावतीची, छायांकित प्रत (कर आकारणी झाली नसल्‍यास खरेदीची प्रत), १०० रुपयांच्या स्‍टॅम्‍प पेपरवर आवश्‍यक करारनामा, मीटर घेतल्‍याची पावती, मीटरचा मेक व क्रमांक अर्जावर नमुद करणे आवश्‍यक आहे. आधार कार्डाची छायांकित प्रत, दोन पासपोर्ट साईज फोटो, नळ कनेक्‍शन करणाऱ्या मनपाचे अधिकृत प्‍लंबरचे नाव, मनपाचे विभागीय फिटरमार्फत नकाशासह परीपूर्ण अहवाल, मनपाचे विभागीय अभियंता यांचा अहवाल, अर्धा इंची नळ जोडणीसाठी लागणारी मनपाची फी ३२५० रुपये, पाऊण इंची नळ जोडणीसाठी लागणारी मनपाची फी ४७५० रुपये, या व्‍यतिरिक्‍त नळ जोडणी करिता लागणारे साहित्‍य व मजुरी चा खर्च ग्राहकास वेगळा करावा लागणार आहे.

Web Title: Criminal Action If Illegal Water Connection Found

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top