खात्यातील रकमेवर चोरट्यांची वक्रदृष्टी

परस्पर होते रक्कम गायब; ‘एटीएम’धारकांनो सावधान
cyber crime
cyber crimesakal media

अकोट : ‘एटीएम’चा पासवर्ड विचारून बँकेच्या खात्यातील रक्कम परस्पर काढून घेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आपल्या खात्यातील रक्कमवर चोरट्यांची नजर असून, एटीएम कार्ड धारकांनी सावध राहण्याची गरज आहे. बँकेकडून नागरिकांच्या सोयीसाठी एटीएम मशीन लावल्या आहेत. यामुळे ग्राहकाला २४ कोणत्याही क्षणी रक्कम काढता येते; मात्र चोरट्यांनी वेगळी शक्कल लढवत आहे. ते निनावी फोनद्वारे कॉल करून ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत.

हॅलो, मै एटीएम कंपनी से बोल रहा हूँ! क्या आप एटीएम कार्ड युज करते है? यावर एटीएम धारकाने ‘हो’ म्हणताच बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून कार्ड ब्लॉक करण्यात आल्याचे सांगण्यात येते. ते सुरू करण्यासाठी ग्राहकांकडून एटीएमचा पासवर्ड मागितल्या जातो. त्यानंतर काही वेळातच बँकेतून रक्कम काढण्यात येते. कोणत्याही बँकेचे एटीएम असेल तरी, त्या बँकेचा अधिकारी बोलतो, असे सांगून ग्राहकाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. या निनावी नंबरवर कॉल केल्यास तो बंद असल्याचे आढळून येते. असाच काहीसा प्रकार अकोट शहरामध्ये घडला आहे. यामुळे काही वृद्धांचेही नुकसान झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत अनेकांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. फसवणुकीचे प्रकार तामिळनाडू, दिल्ली, झारखंड यासह इतरही भागातून होत असल्याचे सांगण्यात येते.

बँकेतून अशा प्रकारचे कॉल केले जात नाहीत. असे कॉल आल्यास गंडविण्यासाठीच माहिती विचारत असल्याचे ग्राहकांनी समजून घ्यावे. याबाबत काही अडचण आल्यास बँकेत जाऊन शंकेचे निरसन करावे.

-पुरुषोत्तम चोखंडे,अध्यक्ष, रअमनि लि., अकोट.

नागरिकांना फसविण्याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रारी आल्या आहेत. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास न ठेवता, बँकेत किंवा पोलिस ठाण्यात चौकशी करावी.

-प्रकाश अहिरे,ठाणेदार, अकोट शहर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com