
बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट बनवून पाठविले अश्लिल संदेश
अकोला : सोशल मीडियाच्या वापरातून विकृतीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. मोबाईन न वापणाऱ्या एका दहावीतील १६ वर्षीय युवतीच्या नावे अज्ञाताने बनावट इन्स्ट्राग्राम अकाऊंट बनवत मैत्रिणी आणि परीसरातील अनेकांना अश्लिल संदेश पाठविले. फोटो शेअर केले. हा प्रकार उघडकीस येताच युवतीने डाबकी रोड पोलिस स्टेसनमध्ये धाव घेतील. युवतीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तक्रारकर्त्या युववतीकडे मोबाइल नाही. आईचा मोबाईल ती वापरते. आईचे इन्स्ट्राग्राम अकाऊंट नाही. असे असताना ता. १३ एप्रिल रोजी अडीच वाजताच्या दरम्यान पालकांसोबत युवती घरीच असताना एक युवक आला व तुमच्या मुलीच्या अकाऊंटवरून शिविगाळ केल्याचे मॅसेज पाठविले असल्याची तक्रार पालकांकडे केली. शिविगाळचे मॅसेस, तिचे व तिच्या आईचे फोटो पाठविले असल्याचे दाखविले. मात्र, ज्या मुलीकडे मोबाइलच नाही व तिच्या आईच्या मोबाईलमध्येही इन्स्ट्राग्राम अकाऊंट नसल्याने ती मॅसेज कशी पाठवेल, हा प्रश्न वडिलांना पडला.
युवकांने मोबाइलची पहाणी केली असता त्यांच्या मोबाइलमध्ये कोणतेही अकाऊंट दिसले नाही. मुलीच्या नावाने कुणीतरी फेक अकाऊंट बनवल्याची बाब लक्षात आली. मुलीची बदनामी करण्याच्या उद्देशाने कुणीतरी दोन फेक अकाऊंट बनवल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी डाबकी रोड पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञाान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Cyber Crime Update Social Media Obscene Messages Sent By Creating A Fake Instagram Account Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..