esakal | शाळा बंद तरीही शैक्षणिक संस्थांकडून पठाणी वसुली
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Educational News Recovery of tuition fees, unpaid teachers; School closure fees continue

शाळा बंद तरीही शैक्षणिक संस्थांकडून पठाणी वसुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन ः गत दीड वर्षापासून कोरानाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र, शैक्षणिक संस्थांकडून १०० टक्के फी ची मागणी करून पठाणी वसूली करण्यात येत आहे. (Demand for fees from educational institutions even after school closes)

हेही वाचा: Success Story; योगेशच्या पेढ्याला राज्यभरासह राज्याबाहेरही मागणी


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरू होणार किंवा नाही याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे बालगोपाळांची किलबिल यंदाही ऐकायला येणार की नाही याबद्दल शंका आहे. २८ जूनपासून यावर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. खाजगी इंग्रजी शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची शाळेमध्ये प्रवेश करण्याची लगबग सुद्धा सुरू झाली आहे. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा दीड वर्षापासून ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत.

हेही वाचा: अबब...२० लाखांचा बोकड,आठवडी बाजारात बघ्यांनी केली गर्दी

त्यामुळे त्यांचा इतर सर्व खर्च कमी झालेला आहे. मात्र, असे असतानाही इंग्रजी शाळा पालकांकडून पूर्ण फी वसूल करण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत कोणत्या प्रकारची फी वसूल करण्यात येऊ नये, असे शिक्षण मंत्र्यांचे आदेश आहेत. मात्र, सदर आदेश झुगारून ज्या विद्यार्थ्यांनी फी जमा केली नाही त्यांचे ऑनलाइन क्लासेस सुद्धा बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शाळा असतानाही नियमित शाळेप्रमाणे नाममात्र फी कमी करून खाजगी शाळांची पठाणी वसुली सुरू आहे.

हेही वाचा: मध्यरात्री स्‍मशानभूमित अघोरी पुजा; मांत्रिकांसह युवकावर कारवाई

त्यामुळे अनेक पालकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करून कुणीही सदर शाळेची तक्रार करण्यास धजावत नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने शाळांचे इलेक्ट्रिक बिल, पाणी बिल, सफाई खर्च, सुरक्षेचा खर्च, वाहतूक खर्च, बचत झाला आहे. लॅब फी, लायब्ररी, ग्रंथालय, संगणक इतर बाबीचा वापर ऑनलाइन शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांनी केला नसतानाही सदर फी शाळांकडून वसूल केली जात आहे. आधीच खाजगी शाळांची फी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे खासगी संस्थांनी ५० टक्के फी कमी करावी व जोपर्यंत शाळा नियमित सुरू होत नाहीत तोपर्यंत फी वसूल करण्यात येऊ नये, अशी पालक वर्गाकडून मागणी होत आहे.

संपादन - विवेक मेतकर

Demand for fees from educational institutions even after school closes

loading image