मराठा आरक्षणासाठी अकोल्यात निदर्शने

मराठा आरक्षणासाठी अकोल्यात निदर्शने
मराठा आरक्षणासाठी अकोल्यात निदर्शने

अकोला ः सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा रद्द झाल्याने अकोल्यात मराठा समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. निकाल लागल्यानंतर बुधवारी सांयकाळी मराठा समाजातील नेत्यांनी स्थानिक सिव्हिल लाइन्स चौकात निदर्शने केली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाच लोकांना निदर्शने करण्यासाठी एकत्र येण्याची परवानगी पोलिसांनी दिली. Demonstrations in Akola for Maratha reservation

त्यामुळे क्रांती मोर्चातील अकोला येथील मोजक्या चारच पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाइन्स चौकात पोलिसांच्या उपस्थितीत नारेबाजी करून आरक्षण आमच्या हक्काचे ते आम्ही मिळविणारच, अशी हाक दिली.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पवार, जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, मनोज तायडे, हेमंत देशमुख, प्रतिक वाकडे, संजय सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. यावेळी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com