बुलडाणा : डेंगीच्या चाचणीसाठी शासकीय प्रयोगशाळाच नाही!

dengue
denguee sakal

बुलडाणा-घाटबोरी : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच काही दिवसांपासून मेहकर तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांनी थैमान घातला आहे. यात मलेरिया, डेंगी, कावीळ सारख्या आजारांचा समावेश आहे. विशेषतः खासगी रुग्णालयात या आजारांच्या रुग्णांची गर्दी दिसून येते. मेहकर तालुक्यासह जिल्ह्यात सध्या हिवताप, डेंगीसदृश आजाराने डोकेवर काढले असून, लवकर निदान व्हावे यासाठी रक्त नमुने चाचणीचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. डेंगी चाचणीसाठी जिल्ह्यात शासकीय प्रयोगशाळा नसल्याने समोर आले आहे. याचाच फायदा घेत खासगी लॅबमध्ये सातशे ते आठशे रुपयांचे दर आकारले जात असल्याने गरिबांना आर्थिक फटका बसत आहे.

पावसाची अनियमितता आणि वातावरणातील बदलामुळे सध्या साथरोग उद्भवत आहे. त्यातच अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव, धूर फवारणीचा अभाव आदी बाबी भर टाकत आहेत. कोरोना नियंत्रणात असला तरी ताप, सर्दी, खोकला, मलेरिया, विषमज्वर, डेंगीसदृश आजाराने डोकेवर काढले आहे. साथरोगावर वेळीच निदान व उपचार व्हावे यासाठी रक्त नमुने चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

dengue
सॉरी मित्रांनो, आता जगाला गुडबाय करण्याची वेळ

तालुक्यासह जिल्ह्यात कुठेही डेंगी चाचणीसाठी शासकीय प्रयोगशाळा नसल्याने रुग्णांना खासगी लॅबमध्ये रक्त तपासणीची वेळ आली आहे. डेंगी, मलेरिया चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये सातशे ते आठशे रुपयांदरम्यान दर आकारणी केली जाते. ही रक्कम सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्याने अनेकजण चाचणी करण्याचेही टाळत असल्याचे दिसून येते.

विविध प्रकारच्या रक्त नमुने तपासणीसाठी प्रत्येक लॅबमध्ये वेगवेगळे दर आकारून रुग्णांची लुबाडणूक होत आहे. रुग्णांची पिळवणूक होऊ नये म्हणून एकसमान दर लॅबमध्ये लावणे आवश्यक असते. कोरोना काळात आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, साथीच्या आजारांनी थैमान घातल्याने खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात स्वतंत्र प्रयोगशाळा नसल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी लक्ष्य घालणे आवश्यक आहे.

dengue
जीवन संपविण्यापूर्वी आईचा मुलींवर प्रेमाचा वर्षांव

डेंगी चाचणीचा अहवाल येण्यास विलंब

डेंगी चाचणीसाठी रक्त नमुने घेतल्यानंतर अकोला येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. दोन ते चार दिवसांनी या नमुन्याचा अहवाल प्राप्त होतो. या दरम्यान रुग्णावर कोणता उपचार करावा? असा पेच डॉक्टरांना पडतो.

जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोकेवर काढलेले दिसते. डेंगीचे रुग्ण संशयित म्हणून जरी आढळले असले, तरी आता जिल्ह्यात डेंगी नियंत्रणात आहे. डेंगी चाचणीची प्रयोगशाळा जिल्ह्यात आठ दहा दिवसांत चालू होईल. आता रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत आहे.
- एस. बी. चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com