कपाशी बियाणे उपलब्ध आहे पण, मिळणार नाही

कपाशी बियाणे उपलब्ध आहे पण, मिळणार नाही

अकोला ः कृषी विभागाने केलेल्या बीटी कपाशी बियाणे पुरवठा ण्याचा नियोजीत उद्दीष्टापैकी २३ टक्के पुरवठा कंपन्यांकडून वितरकांना करण्यात आला असून, सध्या जिल्ह्यातील वितरक व किरकोळ विक्रेत्यांकडे एक लाख ६५ हजार २२४ पाकिटे उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र, कृषी विभागाच्या निर्देशानुसार बियाणे विक्रेत्यांना हे बियाणे १ जूननंतरच शेतकऱ्यांना विक्री करता येणार आहेत. (Distribution of cotton seeds in Akola district)


कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने कापूस पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. शेंदरी बोंडअळीचा जीवनक्रम हंगामापूर्व कापूस लागवड झाल्यामुळे खंडीत न झाल्याने पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढत आहे. हा अनुभव लक्षात घेता खरीप २०२१ मध्ये शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावास आळा घालावयाचा असल्यास शेंदरी बोंडअळीच्या जीवनक्रम खंडीत होण्यासाठी अनेक उपाययोजनांपैकी एक उपाययोजना म्हणून हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही, या दृष्टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे.

त्यासाठी हंगामपूर्व बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून न दिल्यास हंगामपूर्व कापूस लागवड टाळता येऊ शकते. ही बाब लक्षात घेता उत्पादक कपंनीद्वारे वितरकांना १० मे नंतर, वितरकांनी किरकोल विक्रेत्यांना १५ मे नंतर तर, किरकोळ विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना १ जून २०२१ नंतर बीटी कापूस बियाणे पुरवठा करावा, असे निर्देश कृषी विभागाकडून देण्यात आले होते.

कपाशी बियाणे उपलब्ध आहे पण, मिळणार नाही
हंड्याने एक-एका झाडाला पाणी देऊन पिके जगविली, पण काही खरं झालं नाही

त्यानुसार जिल्ह्यात पाच बियाणे उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना व वितरकांकडून किरकोळ विक्रेत्यांना २४ मे पर्यंत एक लाख ६५ हजार २२४ बीटी कापूस बियाणे पुरवठा करण्यात आला असून, १ जून नंतर हे बियाणे शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

कपाशी बियाणे उपलब्ध आहे पण, मिळणार नाही
खासगीसह ट्रॅव्हल्सची बिनधास्त चालती, मग एसटीला ब्रेक का?


नियोजन ७.१४ लाख पाकिटांचे
जिल्ह्यात खरिपासाठी विविध कंपन्यांच्या सात लाख १४ हजार ९६१ बीटी कापूस बियाण्याचा पुरवठा करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यापैकी २४ मे पर्यंत पाच कंपन्यांकडून वितरकांना एक लाख ६५ हजार २२४ पाकिटांचे वितरण करण्यात आले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Distribution of cotton seeds in Akola district

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com