बुलडाणा : मेंढपाळ-वनकर्मचाऱ्यांत झटापट; झाडल्या बंदुकीच्या फैरी

बुलडाणा : मेंढपाळ-वनकर्मचाऱ्यांत झटापट; झाडल्या बंदुकीच्या फैरी

बुलडाणा : जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यअंतर्गत गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकावर ४० ते ५० मेंढपाळांच्या गटाने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत दोन कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. यानंतर हल्लेखोर पसार झाले. ही घटना खामगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव नाथ भागात १० ऑगस्टच्या सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.

ज्ञानगंगा अभयारण्यात बेकायदेशीर मेंढ्या चराईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनकर्मचारी गस्तीवर होते. पिंपळगाव नाथ भागात मेंढपाळ अवैधरीत्या मेंढ्या चारत असल्याचे निदर्शनास येताच कर्मचाऱ्यांनी त्यांनी हटकले. त्यांनी लाठ्याकाठ्यांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

बुलडाणा : मेंढपाळ-वनकर्मचाऱ्यांत झटापट; झाडल्या बंदुकीच्या फैरी
नशिब बलवत्तर; तिसऱ्या माळ्यावरून उडी घेऊनही रुग्ण बचावला

दोन कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी हवेत गोळी झाडली. त्यामुळे तेथील १० ते १२ मेंढपाळ पळून गेले. मेंढपाळांनी ही माहिती त्यांच्या साथीदारांना दिली. त्यामुळे थोड्याच वेळात तिथे आणखी ४० ते ४५ जणांचा जमाव जमला. जमावाजवळ लाठ्या काठ्या आणि शस्त्रे असल्याने वनकर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा हवेत गोळीबार करत दोन फैरी झाडल्या. त्यामुळे हल्ला करणारा जमाव घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी आता बोराखेडी पोलिस तपास करीत आहे. याप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला असून, बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com