अकोला : लहान मुलांची लसीकरणाकडे पाठ

आतापर्यंत केवळ दोन हजार ६१८ लाभार्थ्यांनीच घेतली लस
child vaccination
child vaccinationesakal

अकोला : देशात करोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी लहान मुलांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शासनाने १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचेही लसीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १८ एप्रिलपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्याना लस देण्यात येत आहे. परंतु आतापर्यंत जिल्ह्याती केवळ २ हजार ६१८ लहान मुलांनीच कोर्बेवॅक्स लस घेतली आहे.

देशभरात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्यात आले.

१ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर पोहचले. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात आले. त्यानंतर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढली.

कोरोनाची व्याप्ती वाढवत १५ वर्षावरील युवकांना सुद्धा कोरोनाची लस देण्यात येत आहे. दरम्यान आता १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना सुद्धा कोरोनाची लस देण्यात येत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुलांनी सुद्धा लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे.

आतापर्यंत असे झाले लसीकरण

  • आतापर्यंत लसीकरण - १९ लाख ९२ हजार ८३ लाभार्थी

  • पहिला डोस - ११ लाख ९२ हजार ४८५ लाभार्थी

  • दुसरा डोस - ७ लाख ८४ हजार ५४० लाभार्थी

  • प्रिकॉशन डोस - १५ हजार ५८ लाभार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com