अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दुहेरी जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Double life imprisonment for molesting a minor girl

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दुहेरी जन्मठेप

अकोला - अल्वयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी उल्हास पुंजाजी चव्हाण (वय २३ वर्ष, रा. अजनी बु.) याला कलम ३७६ (२) (जे) अंतर्गत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने कारावास आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ३ (ए), ४ अंतर्गत सुद्धा जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा शनिवारी (ता. १६) ठोठावण्यात आली.

बार्शीटाकळी तालुक्यातील अजनी बु. येथील रहिवाशी अल्पवयीन मुलगी ६ एप्रिल २०१४ रोजी शेतामधील विहिरीवर पाणी आणाण्यासाठी गेली असता ती परत आली नाही. त्यामुळे तिचा शोध घेतला असता बाजूच्या नाल्यातून आवाज आल्याने त्याठिकाणी बघितले असता तिथे आरोपी मुलीवर जबरदस्ती करत असताना पिडीतेची काकू व इतरांनी पाहिले. त्यामुळे सदर ठिकाणावरून पळून गेला, अशी फिर्याद पिडीतेच्या काकूने बार्शीटाकळी पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्यामुळे या प्रकरणी आरोपी उल्हास पुंजाजी चव्हाण (वय २३) याच्या विरोधात पोलिस स्टेशन बार्शीटाकळी येथे विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. न्यायालयात सरकारतर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यासोबतच फिर्यादी व बचाव पक्षाची बाजू समजून घेतल्यानंतर अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.डी. पिंपळकर यांनी आरोपी उल्हास पुंजाजी चव्हाण याला भा.दं.वि. कलम ३७६ (२) (जे) मध्ये आजन्म कारावास, ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त शिक्षा व पॉक्सो कायदा कलम ३ (ए) ४ मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने शिक्षा व पीडिता व कुटुंबियांना धमक्या दिल्या बद्दल भा.दं.वि. कलम ५०६ मध्ये ७ वर्षे शिक्षा १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली.

विविध कलमामध्ये एकूण १ लाख १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. आरोपीला सर्व शिक्षा एकत्रित भोगव्याच्या आहेत. पी.एस.आय. कडेखन पठाण यांनी प्रकरणाचा तपास केला होता. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली.

Web Title: Double Life Imprisonment For Molesting A Minor Girl

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..