लोहगड- वाशीम दरम्यान रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण

आता थेट वाशीमपर्यंत धावणार विजेवरील इंजन
लोहगड- वाशीम दरम्यान रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण

अकोला : अकोला ते पूर्णा दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण सुरू आहे. यातील अकोला ते लोहगडपर्यंतचा टप्पा पूर्वीच पूर्ण झाला आहे. आता लोहगड ते वाशीमदरम्यानच्या ४५ किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणही झाले आहे. त्यामुळे अकोला ते वाशीम दरम्यान विजेवरील इंजनावर रेल्वे धावणार आहेत.

दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ‘मिशन विद्यतीकरण’ सुरू केले आहे. त्यानुसार नांदेड विभागात येणाऱ्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यातीलच एक टप्पा अकोला-पूर्णा विद्युतीकरण परियोजनेचा आहे. त्यात लोहगड ते वाशीम या ४५.३० किलोमीटर दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे अकोला ते वाशीम दरम्यान 80 किलोमीटरपर्यंतचा टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून, या मार्गावर विजेवरील इंजन चालविण्यात येणार आहे.

२०९ किलोमीटरसाठी २७७ कोटी

सन २०१७-१८ मध्ये अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी २७७ कोटी रुपये मंजूर झाले होते. या निधीतून अकोला-पूर्णा दरम्यानच्या २०९ किलोमीटरपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे. त्यातील अकोला ते लोहगड दरम्यानच्या ३४.५ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण मार्च २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले होते. आता लोहगड-वाशिम दरम्यानचा ४५.३ किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने ८० किलोमीटरपर्यंतचा मार्गावर विजेवरील इंजन चालविण्याचा मार्ग मोकळा झाला.

वेळेत काम पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक

रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेळेत पूर्ण करणाऱ्या नांदेड विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दक्षिण मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक संजीव किशोर यांनी कौतुक केले आहे. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणामुळे या मार्गावरील रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांंचे आवागमण वेळेत होण्यास मदत होणार असून, डिझेल इंजनामुळे होणारे प्रदूषणही टाळता येणार आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यातील काम वेळेत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश किशोर यांनी नांदेड विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com