अकोला : शेतकऱ्यांच्या उपोषणाची खासदार कोल्हेंनी घेतली दखल

साखळी उपोषणाचा दुसरा दिवस
farmers hunger strike amol Kolhe Communicate with farmer
farmers hunger strike amol Kolhe Communicate with farmersakal

अकोला : नाबार्डच्या के.सी.सी. सह इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाची शिरूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी दखल घेतली असून, स्वीय सहायकामार्फत त्यांनी शेतकरी पुत्रांसोबत मागण्यासंदर्भात संवाद साधला. शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना पत्रव्यवहार करून नाबार्डद्वारा दिल्या जाणाऱ्या के.सी.सी. योजनेत सकारात्मक बदल करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी (ता.४) सांगवी बाजार येथील शेतकरी विजय गुलाबराव हिंगणकर, कैलास देवराव राऊत, ज्ञानेश्वर देविदास ढवे, दिनेश अंबादास राठोड, संजय महादेव मोरे, नामदेव रामदास लोखंडे व डाॅ.अरुण हलवणे यांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, भाकपचे भाऊराव लांडे, सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड, शेतकरीपुत्र संजय मालोकार यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात माहिती दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा

शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्या मान्य होईपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन मनसे जिल्हाप्रमुख राजेश काळे यांनी केले. मनसेचे मनोज अंबेरे, प्रशंसा अंबेरे, प्रेम पाटील, फिरोज खान, शुभम मार्गे, अभिषेक सुरोसे, गौरव बावणे, निलेश अवारे, वसंतराव मालोकार, मोहन मेहेरे, सुरेश सोनोने, उमेश ठोकळ, अरुण येवले, डाॅ.गजानन डोईफोडे, शंकरराव पाटील, उज्ज्वल इंगळे, संजय मांजरे, चंद्रशेखर गावंडे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून पाठींबा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com